शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरमध्ये शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर; रोहोकलेंनी मागितला लंकेंचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:48 IST

सुजित झावरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे तसेच त्यांना पुरक राजकीय भूमिका घेणारे शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा सेनेचे उपतालुकाप्रमुख विकास उर्फ बंडूशेठ रोहकले यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली.

पारनेर : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे तसेच त्यांना पुरक राजकीय भूमिका घेणारे शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा सेनेचे उपतालुकाप्रमुख विकास उर्फ बंडूशेठ रोहकले यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. लंके यांनी काही दिवसांपूर्वी सुजित झावरेंच्या गाडीचे सारथ्य केले होते़ त्यावरुन आता पारनेरमध्येशिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे.पत्रकारांशी बोलताना रोहकले म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या राजकीय हालचाली संशयास्पद असून त्यामुळे सामान्य शिवसैनिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षात पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत लंके यांनी सेनेच्या विरोधी उमेदवारांना रसद पुरविली. जि. प. च्या ढवळपूरी गटातून पाच वर्षापूर्वी आपण व गेल्या वर्षी आपल्या आईने अनुक्रमे सुजित झावरे व त्यांच्या आई सुप्रिया झावरे यांच्याविरोधात निवडणूक लढविली. तेथे आम्ही झावरे यांच्याविरोधात संघर्ष केलेला असताना पक्षाचे तालुकाप्रमुख मात्र त्यांना पुरक भुमिका घेतात, ही बाब पक्षासाठी हानीकारक आहे. याच गटात अलिकडेच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लंके यांनी राष्ट्रवादीच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचे तसेच इतर उमेदवारांचे जाहिर समर्थन केले, ही बाबही सामान्य शिवसैनिकांना रूचलेली नाही. ढवळपूरी तसेच टाकळी ढोकेश्वर या दोन्ही गटांमध्ये पूर्वी झावरे यांचे प्राबल्य होते. गेल्या 12, 13 वर्षांच्या कालावधीमध्ये शिवसैनिकांनी संघर्ष करून दोन्ही गटावर सेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या संघर्षात अनेक शिवसैनिकांची डोकी फुटलेली असताना लंके झावरेंचे समर्थन त्यांच्या जखमेवर करून मिठ चोळू पाहत आहेत, का असा सवालही रोहकले यांनी केला.

तांबेंच्या पराभवास लंके जबाबदार

भाळवणी पंचायत समिती गणातून पक्षाने बाबासाहेब तांबे यांच्या पत्नी सुमन तांबे यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली होती. तेथेही लंके यांनी खोडा घालून तांबे यांच्या पराभवास हातभार लावला. गोरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाने बाबासाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ उभे केलेले असताना लंके मात्र राष्ट्रवादीच्या कळपात होते. ज्या सुपा गटातून लंके यांच्या पत्नी राणीताई यांनी निवडणूक लढविली त्या गटातही सुजित झावरे समर्थकांशी शिवसैनिकांनी संघर्ष केलेला आहे. मात्र, लंके यांनी आता राजकीय भूमिका बदलून झावरेंशी जवळीक साधली आहे, असे रोहोकले म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरVijay Autiआ. विजय औटीShiv SenaशिवसेनाParnerपारनेर