शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईने घेतला तिघी माय-लेकींचा बळी : कर्जतमध्ये शेततळ्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 18:33 IST

घुमरी गावात धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुली आणि आई यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

कर्जत : घुमरी गावात धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुली आणि आई यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. वटपौर्णिमेच्या दिवशीच दुदेर्वी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.आज सकाळी घुमरीयेथील अनिता शरद पांडुळे (वय ३०), सायली शरद पांडुळे (वय १०) आणि सोनाली शरद पांडुळे (वय ७ वर्षे) या तिघी मायलेकी वटपौर्णिमा असल्याने सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब बापूराव पांडुळे यांच्या शेतातील शेततळ्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. लहान मुलींचा खेळता- खेळता शेततळ््याच्या काठावरून तोल जाऊन पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्याने त्या बुडू लागल्या असता दोघींना वाचविण्यासाठी आई अनिता यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र त्यांनाही पोहता येत नसल्याने अखेर तिघींचा शेततळयातील पाण्यात बुडून अंत झाला.घटना समजताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेह पाहून नातेवाईकानी हंबरडा फोडला. सदर तिघीचा मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. भाऊसाहेब पांडुळे यांच्या खबरीवरून कर्जत पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.पाण्याची टंचाईसध्या तालुक्यातील बहुतांश गावात पाणीटंचाईची परिस्थिती असल्याने पाणी उपलब्ध असणा-या ठिकाणी घरगुती धुन्यासाठी महिला आधार घेताना दिसत आहे. वटपौर्णिमेचा दिवस असल्याने सकाळी लवकर कामे उरकून सण साजरा करावा याविचाराने अनिता आणि त्यांच्या दोन्ही मुली धुणे धुण्यासाठी शेततळ््याववर गेल्या होत्या.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत