शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

तीन दरोडेखोरांना अटक

By admin | Updated: April 20, 2017 17:35 IST

देवळाली प्रवरा येथील सहा जणांच्या टोळीतील तिघांना अमरावती,जालना व बीड जिल्ह्यात रस्तालूट प्रकरणी राहुरी व जालना पोलिसांनी अटक केली़

राहुरी : देवळाली प्रवरा येथील सहा जणांच्या टोळीतील तिघांना अमरावती,जालना व बीड जिल्ह्यात रस्तालूट प्रकरणी राहुरी व जालना पोलिसांनी अटक केली़रवींद्र शिंदे (वय २२) अजय दुशिंग (वय २१),सागर पंडित (वय २४),राकेश संसारे (वय २१),बबलू शिरसाट (वय २१, सर्व राहणार देवळाली प्रवरा), रतन उर्फ अमोल गरूड (वय २२) या सहा जणांच्या टोळीने जालना,अमरावती व बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ता लूट करून प्रवाशांना हैराण केले होते. अनेक दिवसांपासून तीन जिल्ह्यांचे पोलीस टोळीचा शोध घेत होते़ गेल्या १५ दिवसांपूर्वी राहुरी येथील दूध टँकर जालना येथे गेला होता़ या टँकरवरील चालक मोहन शिंदे हा रात्री जालना येथील मंठा रस्त्याच्या कडेला झोपला होता़ सहा जणांची टोळी अचानक येऊन चालक शिंदे यास मारहाण करून ५० हजार रूपये रोख व मोबाईलची लूट करून पसार झाले होते़टँकर चालक मोहन शिंदे यांनी याबाबत जालना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ गुन्ह्याच्या तपासादरम्यान जालना येथील पोलीस नाईक विष्णू चव्हाण,पर्वत मुंढे,कल्याण आटोळे,नसीर पठाण यांच्या पथकाने १९ एप्रिलला राहुरीचे निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा पोलीस चौकीतील पोलीस नाईक गौतम लगड व सतीष त्रिभुवन यांच्या मदतीने रवींद्र शिंदे व अजय दुशिंग या दोघांना राहत्या घरी छापा टाकून पकडले़ याशिवाय सागर पंडित याला पाठलाग करून ताब्यात घेतले़ सहापैकी एक आरोपी हा नगर व पाच आरोपी देवळाली प्रवरा येथील आहेत़ या आरोपींच्या माध्यमातून महत्त्वाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़