शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

नगरपालिकेचे तीन कर्मचारी निलंबित

By admin | Updated: October 27, 2023 17:25 IST

संगमनेर : नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील महत्वाची फाईल गहाळ करून कामात हलगर्जीपणा करणार्‍या तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले.

संगमनेर : नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील महत्वाची फाईल गहाळ करून कामात हलगर्जीपणा करणार्‍या तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. नगरपालिकेच्या अग्नीशामक विभागाच्या नूतनीकरणाचे काम सध्या चालू आहे. बांधकामाच्या ठेकेदाराने नूतणीकरणाच्या कामासंबंधी महत्वाची कागदपत्रे व बिले असलेली फाईल बांधकाम विभागाकडे दिली. पालिकेच्या आवक-जावक विभागात जमा झालेली फाईल बांधकाम विभागास दिली. परंतु सदरची फाईल अचानक गहाळ झाली. या कारणावरून आवक-जावक व बांधकाम विभागामध्ये वाद सुरू होता. कामात हलगर्जीपणा करून महत्वाची फाईल गहाळ केल्याचा ठपका ठेवून आवक-जावकचे शिपाई महेबूब पठाण, लिपिक सतीश डोळसे व गोरख निचळ यांच्या निलंबनाचे आदेश मुख्याधिकार्‍यांनी काढले. या करवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी) बांधकाम विभागाची महत्वाची कागदपत्रे व बिलांची फाईल कर्तव्यात कसूर करून हलगर्जीपणाने गहाळ केल्यामुळे तीन कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. - श्रीनिवास पगडाल, प्रशासन अधिकारी