शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात आणखी तीन नवे पॉझिटिव्ह, बोल्हेगाव, भावी निमगाव, राहात्यामध्ये रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:38 IST

अहमदनगर : सोमवारचा दिवस निरंक गेल्यानंतर मंगळवारी दोन नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये एक शेवगाव येथील असून दुसरा नगर येथील आहे.

अहमदनगर : सोमवारचा दिवस निरंक गेल्यानंतर मंगळवारी दोन नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये एक शेवगाव येथील असून दुसरा नगर येथील आहे.मुंबई येथून भावी निमगाव येथे आलेला ४१ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.  तसेच कुर्ला येथून बोल्हेगाव फाटा येथे आलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती कुर्ला येथे चालक म्हणून काम करीत होती. राहाता येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह  आला.जिल्ह्यात सोमवारी एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याने एक मोठा दिलासा मिळाला होता. बरे होणाºयांचे प्रमाण ८० टक्के झाले आहे. मात्र मंगळवारी पुन्हा दोन जण आढळून आले आहेत. दरम्यान मंगळवारी सकाळी सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये संगमनेर शहरातील चार, राहाता शहरातील दोन आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या २१३ झाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये मंगळवारी ६२ जणांच्या घशातील स्त्रावांची तपासणी केली होती. त्यामध्ये ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरीत ३१ पैकी दोन जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती  नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.