अहमदनगर : नगर तालुक्यातून तीन आमदार होण्याचे स्वप्न नगर तालुक्यातील राजकीय अस्मितेच्या अभावामुळे धुळीला मिळाले आहे. तालुक्यातील राजकीय अस्मितेची या निवडणुाकीत ऐसी-तैशी झाल्याने नगर तालुक्यातील ४६ टक्के मते दुसर्या तालुक्यातील उमेदवारांच्या पदरात टाकल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्डिले यांच्या माध्यमातून एकच आमदार या तालुक्याला मिळू शकला.
नगर तालुक्याचे त्रिभाजन झाल्यानंतर झालेल्या दुसर्या विधानसभा निवडणुकीत कर्डिले यांच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेचे शशिकांत गाडे यांनी o्रीगोंदय़ातून तर माधवराव लामखडे यांनी पारनेर मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. त्यामुळे तालुक्यातील मतदार तालुक्याची अस्मिता म्हणून एक येतील व तालुक्यातील उमेदवारालाच एकगठ्ठा मतदान करतील, असे चर्वितचर्वण या निवडणुकीत चांगलेच चर्चेला आले. तीन आमदार मिळण्याचे स्वप्नही तालुक्याने बाळगले खरे पण कर्डिले यांचा अपवाद वगळता गाडे, लामखडे यांना तालुक्यातील जनतेने नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर तालुक्याची अस्मिता म्हणून मतदार पाठिशी राहतील हे गृहीत धरून गाडे यांनी o्रीगोंदय़ातून व लामखडे यांनी पारनेमधून दंड थोपटले. पण घरच्या मैदानावरच त्यांची निराशा झाली.
गाडे यांना नगर तालुक्यातून फक्त ३६ टक्के, लामखडे यांना ४६ टक्के मते मिळाली. कर्डिले यांनी तालुक्यातील ७२ टक्के मते मिळविली. तालुक्यातील एकूण मतांपैकी ४६ टक्के मते तालुका बाहेरील उमेदवारांना मिळाल्याने तालुका अस्तितेचा फुगा फटला.(तालुका प्रतिनिधी)
■ गाडे, लामखडे, यांची घरच्या मैदानावरच निराशा झाली असली तरी आ. कर्डिले यांना होम ग्राऊंड ने मोठी साथ दिली तालुक्यातील इतर दोन उमेदवार असताना ही त्यांनी ७२ मिळवली ३३२७0 मतापैकी त्यांनी २४ हजार मते मिळवली अमोल जाधव, गोविंद मोकाटे या तालुक्यातील उमेदवारांनी तालुक्यातुन केवळ १३00 मते मिळवली डॉ.उषाताई तनपुरे ५ हजार ७१५ मते घेऊन तालुक्यात दुसर्या क्रमांकावर राहिल्या
■ नगर तालुक्यातील निंबळक, आरणगाव व देहरे गटातील मतांच्या जिवावर आमदार व्हायला निघालेल्या लामखडेंना तालुक्यातील फक्त ४६ टक्के मतदारांनीच पसंती दिली. लामखडे यांनी तालुक्यातुन केवळ १0 हजार ४0५ मतांची आघाडी घेतली. आ.विजय औटी यांचा प्रभाव कमी करण्यास त्यांचे प्रयत्न एकाकी पडले बाबासाहेब तांबे, सुजीत झावरे, औटी यांनी तालुक्यातील ५४ टक्के मिळवली औटी यांच्या पेक्षा लामखडे यांनी तालुक्यातुन साडे दहा हजार मते जास्त मिळवली.
■ श्रीगोंदा मतदार संघात नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गट व वाळकी गटातून ४६,000 मते होती. यातील दोन्ही गटामुधुन गोडेंना फक्त १६ हजार मते तर राहुल जगताप यांना १४ हजार मते आणि बबनराव पाचपुते यांना १३ हजार मते मिळाली. यात चिचोंडी पाटील गटातुन गाडेंना अवधी दोन हजार मतांची आघाडी तर वाकळी गटातुन गाडे जगताप यांच्या पेक्षा दिड हजार मतांनी पिछाडीवर राहिले गाडे व पाचपुते हे वाळकी गटातुन जवळपास बरोबरीनेच राहिले वाळकी व गुंडेगाव येथील काँग्रेस कर्याकर्त्यांनी उघडपणे काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी गुंडेगाव मधुन पाचपुतेंना आघाडी मिळाली वाळकी गावातुन जगताप यांना आघाडी मिळाली. जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ तटस्थ दिसत असले तरी त्यांच्या कार्यंकर्त्यांनी राष्ट्रवादीचा प्रचार केल्याचे उघड झाले. नगर तालुक्यातुन गाडेंना फक्त २ हजार मतांची आघडी मिळाली.