शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकरात तीन लाखांचे खरबूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 13:01 IST

तालुक्यातील चिंभळे येथील पैलवान किरण व भूषण गायकवाड यांनी दीड एकर क्षेत्रात खरबुजाचा मळा फुलविला. पैलवानांच्या श्रमाला गोड फळे बहरली अन अवघ्या तीन महिन्यात दीड एकर क्षेत्रात तीन लाखाचा आर्थिक सुगंध दरवळला आहे.

बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : तालुक्यातील चिंभळे येथील पैलवान किरण व भूषण गायकवाड यांनी दीड एकर क्षेत्रात खरबुजाचा मळा फुलविला. पैलवानांच्या श्रमाला गोड फळे बहरली अन अवघ्या तीन महिन्यात दीड एकर क्षेत्रात तीन लाखाचा आर्थिक सुगंध दरवळला आहे. गायकवाड बंधूंनी शेतीतील यशाची कुस्ती निकाली झाली.दादासाहेब गायकवाड यांना १५ एकर माळरान शेती पोकलेनने दगड धोंडे जमिनीत गाडून सपाटीकरण केले. एक मळा तयार केला. दादासाहेब यांना कुस्तीचा छंद असल्याने किरण आणि भूषणला पैलवान केले. कुस्त्या करता करता किरण व भूषण यांना शेतीचा छंद लागला. दादासाहेब व काकासाहेब यांनी शेततळे करून दिले. हळूहळू शेतीला आकार येऊ लागला. शेतीत ज्वारी, तूर ऐवजी भाजपाला आणि फळ शेतीत बहर दरवळू लागला.किरण व भूषण बंधूंनी नियोजन आणि श्रमाकडे लक्ष केंद्रित केले. पाच एकर गुलाबी कांद्यात आठ लाखाचे उत्पन्न काढले तर एक एकर टॉमेटोमधून पाच लाखाचा नफा मिळविला. मल्चिंग पेपर, ठिंबक सिंचनचा वापर करून दीड एकर क्षेत्रात खरबुजाचा मळा फुलविला आणि कृषितज्ज्ञ मधुकर काळाणे यांचे मार्गदर्शन घेतले. खरबुजाच्या पिकातून तीन महिन्यात तीन लाखाचे उत्पादन किरण व भूषण बंधूंनी घेतले. शेतीतील यशाची कुस्ती निकाली करून शेतीत अधिक उत्पन्न काढण्यासाठी नियोजन व कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली आहे.

वडिलोपार्जीत कमी शेती होती. चुलते काकासाहेब व वडिल दादासाहेब यांनी बोअरचा व्यवसाय करून शेती वाढविली आणि मला व भूषणला पैलवान केले. पैलवानकीची ताकद कुणाला तरी दम देण्यासाठी करण्यापेक्षा शेतीत मुरविण्याचा निर्णय घेतला. अल्प कालावधीत चांगले यश आले. त्यामुळे शेतीत काम करण्यासाठी उत्साह वाढला आहे, असे किरण गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा