शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

श्रीगोंद्यात तिच तीन घराणी ! झेंडे मात्र बदलणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:58 IST

विधानसभेची निवडणूक जवळ येताच श्रीगोंदा मतदार संघातील राजकीय किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे.

ठळक मुद्देभाजपाकडून माजी मंत्री बबनराव पाचपुतेराष्ट्रवादीकडून आमदार राहुल जगतापअनुराधा नागवडेही उतरणार रिंगणात

बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा : विधानसभेची निवडणूक जवळ येताच श्रीगोंदा मतदार संघातील राजकीय किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मतलबी वारे जोराने वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांची भाजपाशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील राजकीय पक्षांच्या उमेदवारींची समीकरणे बदलणार का? यावर चर्चा झडत आहेत.भाजपाकडून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. २०१४ मध्ये पाचपुते यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला होता. श्रीगोंद्यातील काही विखे समर्थकांनी आमदार राहुल जगताप यांना भाजपात आणण्यासाठी विखे, पिचड आणि दानवे यांच्या माध्यमातून फिल्डींग लावली आहे.नुकतेच अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य साखर संघावर राजेंद्र नागवडे आणि घनश्याम शेलार यांना संधी देऊन राष्ट्रवादी उमेदवारासाठी तटबंदी मजबूत करण्यासाठी व्यूहरचना आखली. मात्र त्याचा फायदा निवडणुकीत कितपत होईल, हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये घेतलेल्या मुलाखतीला आमदार राहुल जगताप उशिरा गेले. त्याचवेळी त्यांच्या पक्षांतराबाबत शंकेची पाल चुकचुकली. त्याचवेळी राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार यांनीही राष्ट्रवादीचा इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली.माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. पाचपुतेंना भाजपाची उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. मात्र पक्षांतर्गत गटबाजी आणि मंत्री पदासाठी काटाकाटीच्या राजकारणात काहीही घडू शकते.भाजपाने आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी दिली तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना पुन्हा एकदा वेगळे चिन्ह घेऊन निवडणुकीस सामोरे जावे लागेल. आघाडीकडून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे श्रीगोंद्याच्या आखाड्यात पाचपुते, जगताप आणि नागवडे या दिग्गज घराण्यात लढाई रंगणार आहे.कमळ आणि अपयशश्रीगोंदा विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीत यापूर्वी माजी खासदार दिलीप गांधी, खासदार डॉ. सुजय विखे यांच्या रुपाने भाजपाला मताधिक्य दिले. पण एकाही विधानसभा निवडणुकीत भाजपाला श्रीगोंदेकरांनी स्वीकारले नाही. राजेंद्र नागवडे, बबनराव पाचपुते यांना भाजपाकडून उमेदवारी केली पण त्यांनाही जनतेने नाकारले. आता कमळ कुणाच्या पदरात पडते यावर उत्सुकता राहणार आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाPoliticsराजकारण