शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत वाळूसह तीन डंपर पकडले : ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 19:01 IST

तालुक्यातील अवैध वाळू तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या व पाथर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे.

पाथर्डी : तालुक्यातील अवैध वाळू तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या व पाथर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. शनिवारी (दि.११) दुपारी फुंदेटाकळी शिवारातून शासनाचा कर चुकवून चोरीची वाळू वाहतूक करणारे तीन डंपर व वाळू असा ३० लाख ४८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तीन डंपर चालकांना यावेळी अटक करण्यात आली.फुंदेटाकळी शिवारात मुंगी येथून वाळू भरून तीन डंपर पाथर्डीकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. हे. कॉ. बाळासाहेब भोपळे, पो. कॉ. सागर सुलाने, पो. कॉ. जालिंदर माने, तसेच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पो. हे. कॉ. रेवणनाथ रांझणे, पो. कॉ. राहुल खेडकर, पो. कॉ. बडधे यांच्या पथकाने सापळा लावून तीन डंपर पकडले. त्यात प्रत्येकी ४ ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. त्यामुळे डंपर (क्र. एम. एच. १६ ए. वाय ५४५ ) चालक दत्तात्रय ऊत्तम गरड रा. मुंगी, ता. शेवगाव व मालक सुधीर संभाजी शिरसाठ रा. शिरसाठवाडी, दुसरा डंपर (क्र. एम. एच. ०५ सी. जी. ४२००) चालक योगेश भिवाजी पांडव रा. मुंगी, मालक संदिप कचरू पालवे रा. भेडा खुर्द, ता. नेवासा तसेच तिसरा डंपर (क्र. एम. एच. १७ बी. डी. ७६७६) वरील चालक शाहरूख रज्जाक शेख रा. मुंगी, मालक संदीप कचरू पालवे यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. तरीही ते वाळू चोरी करत होते. पो. कॉ. विनोद मासाळकर यांनी याबाबत फिर्याद दिली. तीन डंपर वाळूसह एकूण ३० लाख ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीनही डंपर चालकांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी