शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हारमध्ये आढळली बिबट्यांची तीन बछडे; वनखात्याने लावला पिंजरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 16:32 IST

कोल्हार येथील नितीन देवकर यांच्या वस्तीवरील डाळिंबाच्या बागेत बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वनखात्याने त्यांना पुन्हा पिंज-यात ठेवले आहे. त्यामुळे बछड्यांची मादी पिंज-यात जेरबंद होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वनखात्याने सापळा लावला आहे.

कोल्हार : कोल्हार येथील नितीन देवकर यांच्या वस्तीवरील डाळिंबाच्या बागेत बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वनखात्याने त्यांना पुन्हा पिंज-यात ठेवले आहे. त्यामुळे बछड्यांची मादी पिंज-यात जेरबंद होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वनखात्याने सापळा लावला आहे. सध्या कोल्हार भगवतीपूरसह परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार आणि धुमाकूळ सुरूच आहे. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात गळनिंब व कुरणपूर येथे दोन चिमुरड्या गंभीर जखमी झाल्यानंतर आता वनखात्याचे अधिकारी जागे झाले आहेत. कोल्हार येथील तीन चारी परिसरात नितीन देवकर यांच्या गट नंबर ३७२ मध्ये डाळिंबाच्या बागेत रविवारी सकाळी तीन बछडे आढळून आले. त्यांनी तातडीने वनखात्यास याची माहिती दिली. सध्या इथेच गळनिंब परिसरात ठाण मांडून बसलेल्या अधिका-यांनी तातडीने धाव घेत बछड्यांना ताब्यात घेतले आहे.पिंज-याच्या ठिकाणी जाण्यास मनाईबिबट्याच्या मादीला या ठिकाणचे पिल्ले दिसली नाहीत तर पिल्लांच्या विरहाने मादी धुमाकूळ घालू शकते. या पार्श्वभूमीवर तिन्ही बछड्यांना पिंजरा लावून त्यामध्ये ठेवण्यात आले आहेत. बछड्यामुळे बिबट्या मादीही जेरबंद होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पिंज-याजवळ कोणीही जाण्यास धजावत नाही. कुठल्याही क्षणी बिबट्याची मादी पिल्लांच्या शोधत आल्यास मानवावर हल्ला करू शकतो. यासाठी सदर परिसरात सर्वांना जाण्यास बंदी केली आहे. बिबट्या नर अथवा मादी पिंज-यात अडकल्यास एका मागोमाग पाचवा बिबट्या जेरबंद होऊन परिसरातील बिबट्याची दहशत कमी होऊ शकते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाताleopardबिबट्याforest departmentवनविभाग