शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

लोणी मावळा हत्याकांडात तीन आरोपी दोषी; मंगळवारी अंतिम निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 17:03 IST

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणा-या तिघा आरोपींवर सोमवारी जिल्हा ...

ठळक मुद्दे‘लोणी मावळा’चा घटनाक्रम२२ आॅगस्ट २०१४ रोजी तिघा आरोपींनी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करत खून केला.२३ आॅगस्ट २०१४ रोजी आरोपी संतोष लोणकर याला अटक२५ आॅगस्ट रोजी घटनेच्या चौथ्या दिवशी उर्वरित दोघा आरोपींना अटक१८ नोव्हेंबर २०१४ रोजी या प्रकरणी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखलडिसेंबर २०१४ रोजी या खटल्यासाठी अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती१ जुलै २०१५ रोजी न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ७ जुलै २०१७ खटल्याची सुनावणी पूर्ण

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणा-या तिघा आरोपींवर सोमवारी जिल्हा न्यायालयात दोष सिद्ध झाला. या खटल्याचा मंगळवारी निकाल देण्यात येणार आहे. संतोष विष्णू लोणकर (वय ३५), मंगेश दत्तात्रय लोणकर (वय ३०) व दत्तात्रय शिंदे (वय २७, रा. सर्व लोणी मावळा) असे दोष सिद्ध झालेल्या आरोपींची नावे आहेत.निकाल देण्याआधी मंगळवारी न्यायालयात आरोपींच्या वतीने त्यांचे वकील अंतिम म्हणणे सादर करणार आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर लोणी मावळा खटला सुरू आहे. मंगळवारी न्यायालयाने आरोपींना समोर उभे करून तुम्ही तिघांनी लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीचा कट करून पाठलाग करत तिच्यावर अत्याचार करून खून केल्याचे सिद्ध झाले आहे. या आरोपासाठी फाशी अथवा जन्मठेप, अशी शिक्षेची तरतूद आहे, असे न्यायालयाने सांगत आरोपींना म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, यावेळी न्यायालयात सर्व आरोपींचे वकील उपस्थित नसल्याने आरोपींच्या वतीने मंगळवारी म्हणणे सादर करण्यात येणार आहे.लोणी मावळा येथे २२ आॅगस्ट २०१४ रोजी संतोष लोणकर, मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे याने शाळेतून घरी परतत असताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा खून केला होता. या घटनेनंतर दुस-या दिवशी संतोष याला पारनेर पोलिसांनी अटक केली होती़ त्यानंतर चार दिवसांनी उर्वरित दोघा आरोपींना अटक झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी १८ नोव्हेंबर २०१४ रोजी जिल्हा न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले़ सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी खटला लढविला़ आरोपींच्या वतीने अ‍ॅड. अनिल अरोटे, अ‍ॅड. राहुल देशमुख, प्रीतेश खराटे व परिमळ फळे यांनी हा खटला लढविला.या घटनेचा तपास पारनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक शरद जांभळे यांनी केला होता़ लोणी मावळा येथील घटनेनंतर पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात जनभावना तीव्र बनल्या होत्या. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारकडे केली होती़ त्यानंतर सरकारने अ‍ॅड़ निकम यांची नियुक्ती केली होती.

सरकारी पक्षाने तपासले ३२ साक्षीदार

लोणी मावळा खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण ३२ साक्षीदार तपासण्यात आले़ या घटनेत प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता; मात्र सरकारी पक्षाने न्यायालयात २४ परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयात सादर केली. या खटल्यात अ‍ॅड. निकम व अ‍ॅड. बाबासाहेब माळवे यांनी सहकार्य केले.

आरोपींवर सहा आरोप

अल्पवयीन मुलीचा खून करणा-या तिघा आरोपींवर दोषारोपपत्रात कट, कटानुसार पाठलाग करून अत्याचार, खून व बाललैंगिक अत्याचार, असे सहा आरोप ठेवण्यात आलेले आहेत. सदर अल्पवयीन मुलगी ही अळकुटी येथील विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आरोपींनी तिच्यावर अत्याचार व खून करून मृतदेह पिंपळगाव जोगा येथील कॅनॉलमध्ये फेकून दिला होता.अण्णांकडून अ‍ॅड. निकम यांचे अभिनंदनतिघा आरोपींवर न्यायालयात दोष सिद्ध झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फोन करून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालय