शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सैराटची पुनरावृत्ती करण्याची मुलींना धमकी

By admin | Updated: August 17, 2016 00:50 IST

शेवगाव : स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वरूर (ता. शेवगाव) येथील घरी परतणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग करून सैराटची पुनरावृत्ती करण्याची धमकी दिल्याप्रकरणी

शेवगाव : स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वरूर (ता. शेवगाव) येथील घरी परतणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग करून सैराटची पुनरावृत्ती करण्याची धमकी दिल्याप्रकरणी राकेश विजू गरूड (वय २०, रा. वरूर) याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. एक दिवस गाव बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. या घटनेमुळे वरूर गावात तणाव निर्माण झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून गावात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेवगावपासून पाच किलोमीटर अंतरावरील वरूर बुद्रूक येथील दोन शाळकरी विद्यार्थिनी सोमवारी शेवगाव येथे शाळेतील स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपून ११ वाजेच्या सुमारास घरी वरूरला जाण्यासाठी निघाल्या होत्या. गावानजिकच्या ओढ्याच्या माथ्याजवळ या दोघींना मोटारसायकलवरुन आलेल्या दोन मुलांनी अडविले. तुमचा मोबाईल नंबर द्या, नाही तर तुमचा सैराट करू, असे धमकावले. तसेच त्यांचा पाठलाग करून छेडछाड केली.या घटनेमुळे भयभीत झालेल्या मुलींनी ही घटना आपल्या पालकांना सांगितली. ही घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी शेवगाव पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. एका मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राकेश गरूड व त्याच्या अल्पवयीन साथीदाराविरूद्ध भादंवि कलम ३४१, ३४२, ३५४ ड बालकांचे लैंगिक अपराधातून संरक्षण कलम १२ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. मंगळवारी वरूर गावात कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहे. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शेवगाव पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.(तालुका प्रतिनिधी)