शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी १८ हजार मतदान यंत्रे शहरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 14:59 IST

राज्यात आॅक्टोबरमध्ये विधासभेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी तामिळनाडू राज्यातून १८ हजार मतदान यंत्रे नगरमध्ये दाखल झाली आहेत.

अहमदनगर : राज्यात आॅक्टोबरमध्ये विधासभेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी तामिळनाडू राज्यातून १८ हजार मतदान यंत्रे नगरमध्ये दाखल झाली आहेत. ही सर्व यंत्रे एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात उतरविण्यात आली आहेत.आॅक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून मतदान यंत्रांची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वापरलेली मतदानयंत्रे नगरमध्येच असली तरी ती यंत्रे विधानसभेला वापरली जाणार नाहीत. त्यामुळे विधानसभेसाठी तामिळनाडू राज्यातील मतदानयंत्रे मागवण्यात आली आहेत. विधानसभेसाठी भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीचे ७ हजार बॅलेट युनिट, ५ हजार २३० कंट्रोल युनिट, तर ५ हजार ४५० व्हीव्हीपॅट आदी सुमारे १८ हजार यंत्रे लागणार आहेत. ही यंत्रे तामिळनाडू राज्यातील वेल्लोर जिल्ह्यातून घेऊन येण्याचे आदेश केंद्रीय आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी उदय किसवे, पुनर्वसन विभागाचे तहसीलदार महेश शेलार या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी-कर्मचाऱ्यांची दोन पथके ही यंत्रे आणण्यासाठी गेली होती.हे अधिकारी रविवारी (दि. ११) ही सर्व यंत्रे घेऊन पोलीस बंदोबस्तात नगरला दाखल झाले. आता ही यंत्रे एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली गेली आहेत.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गोदामाला भेट देऊन पाहणी केली. लवकरच या मतदानयंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी केली जाणार आहे.जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार मतदान केंद्र आहेत. त्याच्या दुप्पट मतदान यंत्र प्रशासनाने मागवले आहेत. एका बॅलेट युनिटवर नोटा व १५ उमेदवारांची नावे समाविष्ट होऊ शकतात. त्यापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिले तर एका केंद्रावर दोन बॅलेट युनिट लावावे लागतात. त्यामुळेच प्रशासनाने ही जादा यंत्रे मागवली आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय