शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

 हजारो भाविकांनी घेतले मतमाऊलीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 14:52 IST

हरेगाव येथील मतमाऊली यात्रेस शनिवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरूवात झाली. यावेळी हजारो भाविकांनी माऊलीचे दर्शन घेतले. भिज पावसातही भाविकांमध्ये दर्शनाची ओढ दिसून आली.

श्रीरामपूर : राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हरेगाव येथील मतमाऊली यात्रेस शनिवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरूवात झाली. यावेळी हजारो भाविकांनी माऊलीचे दर्शन घेतले. भिज पावसातही भाविकांमध्ये दर्शनाची ओढ दिसून आली.राज्यात मुंबईनंतर हरेगाव येथील मतमाऊलीची यात्रा प्रसिद्ध आहे. यात्रेचे हे ७१ वर्ष आहे. दर्शनासाठी आलेल्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रबरोबरच मराठवाड्यातील भाविकांची संख्या मोठी होती.  शेकडो किलोमीटर अंतर दिंडीने पायी चालत आलेल्या भाविकांसाठी सर्वच प्रमुख मार्गावर विविध सामाजिक संस्थांद्वारे चहा व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीरामपूर आगारातून एस.टी. बसेसच्या दिवसभर फेºया सुरू आहेत. यात्रा मंगळवारपर्यंत चालणार आहे.मतमाऊली चर्च येथे १ जुलैपासून यात्रापूर्व नोव्हेना नऊ शनिवारी झाली. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी औरंगाबाद धर्मप्रांतचे महागुरुस्वामी अम्ब्रोज रिबेलो यांच्या हस्ते मतमाउली यात्रेस ध्वजारोहणाने प्रारंभ झाला. यात्रेपर्यंत दहा दिवस नोव्हेना घेण्यात आली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता जपमाळ, नोव्हेना, विधिवत मुकूट चढविणे हे धार्मिक कार्यक्रम पार पडले. स्थानिक धर्मगुरू नोलास्को, डॉमनिक रिचर्ड, व्हीकर जनरल वसंत सोज्वळ आदी धर्मगुरू यावेळी उपस्थित होते.  हरेगाव फाटा ते चर्चपर्यंत पदयात्रेकरुंची रिघ लागली होती. दिवसभर तासातासाला फादर सचिन मनतोडे, पीटर डिसोझा, विशाल त्रिभुवन, फ्रान्सिस ओहोळ, विलास सोनवणे, सांतान रोड्रीग्ज यांची पवित्र मिस्सा झाली. दुपारी साडेचार वाजता नाशिक धर्मप्रांतचे प्रमुख धर्मगुरू लुुईस डनियल यांनी भाविकांना प्रवचन दिले. त्यांनी पवित्र मारियेचा महिमा व महत्व सांगितले. चर्च व डोंगरावर विद्युत रोषणाई सजावट करण्यात आली आहे. 

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरAhmednagarअहमदनगर