शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या डोक्यावर तीन हजार कोटी कर्जाचा डोंगर

By admin | Updated: May 10, 2017 13:40 IST

बळीराजाला शेतातील उत्पादकता वाढविण्यास मदत व्हावी, या हेतूने शासनाच्या निर्देशानुसार विविध बँकाकडून जिल्ह्यात मार्चअखेर ३३६५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले.

आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ १० - बळीराजाला शेतातील उत्पादकता वाढविण्यास मदत व्हावी, या हेतूने शासनाच्या निर्देशानुसार विविध बँकाकडून जिल्ह्यात मार्चअखेर ३३६५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. परंतु दुष्काळी स्थिती, शेतमालाचे घसरलेले दर यामुळे कर्जफेड करायची कशी या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. नगर जिल्ह्यातील बहुतांश तालुके दुष्काळी आहेत. त्यामुळे पाण्याअभावी येथील शेती कायमच तोट्यात असते. शेतकऱ्यांना हातभार लागावा म्हणून शासन विविध राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून खरीप व रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. नगर जिल्ह्यातही विविध बँकांमार्फत तब्बल ३३६५ कोटींचे कर्ज शेतकऱ्यांच्या जमिनीवर देण्यात आले आहे. वर्षानुवर्षांचा दुष्काळ, तसेच यावर्षी शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करण्यात मोठ्या अडचणी आल्या. काही शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले. यंदाही कर्जमाफीची टूम उठली, काही दिवस शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट होताच पुन्हा चेहरे पडले. त्यामुळे आता शासनाने एक तर कर्जमाफी द्यावी, नाहीतर शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मार्च २०१७ अखेरचे पीककर्ज वाटपजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - १७१७ कोटी एकूण राष्ट्रीयकृत बँका- १६३९ कोटी ग्रामीण बँका - ८.६५ कोटी दुहेरी फटकाशेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या नगर येथील जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक स्थिती राज्यात सर्वोत्तम आहे. नगरच्या शेजारील जिल्ह्यांतील बँका एकीकडे अडचणीत येत असताना नगर जिल्हा बँक मात्र मजबूत राहिली. त्यामुळे बँकेकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले जाते. परंतु यंदा कर्जमाफीच्या आशेने नगर जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीतही मोठी घट झाली. कर्जमाफी होणार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जफेड केली नाही, परिणामी त्यांना व्याजातील सवलत मिळाली नाही. आता कर्ज थकीत असल्याने व्याजाचा भुर्दंड भरावा लागेल, शिवाय नवीन कर्जही मिळणार नाही. कर्जमाफीच्या अफवेने असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला.