शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यातील २४ हजार बालके कमी वजनाची; राजूरमध्ये सर्वाधिक कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:17 IST

जिल्ह्यातील कमी वजनाच्या बालकांना कुपोषणाच्या धोक्यातून बाहेर काढण्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या प्रयत्नांना काहीसे यश आले आहे. कमी वजनाच्या बालकांची संख्या घटून २४ हजारांवर आली आहे. तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्याही घटून ३ हजार ८७४ वर आली आहे़. 

अहमदनगर : जिल्ह्यातील कमी वजनाच्या बालकांना कुपोषणाच्या धोक्यातून बाहेर काढण्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या प्रयत्नांना काहीसे यश आले आहे. कमी वजनाच्या बालकांची संख्या घटून २४ हजारांवर आली आहे. तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्याही घटून ३ हजार ८७४ वर आली आहे़. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे जिल्ह्यात एकात्मिक बालविकासचे २१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांद्वारे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून कुपोषण कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. जानेवारीमध्ये ३ लाख २३ हजार बालकांचा सर्व्हे करण्यात आला. बालकांचे वजन, उंची, दंडघेर घेत बालकांचे आरोग्य तपासण्यात आले. दर महिन्याला कुपोषणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात आहे. डिसेंबर २०१९ मध्ये सुमारे ३० हजारपेक्षा जास्त बालके कुपोषित असल्याची आकडेवारी सर्वेक्षणातून पुढे आली होती़. सर्वेक्षणात ही आकडेवारी २४ हजार ९०० वर आली आहे. तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या डिसेंबरमध्ये ४ हजार ८० वरून ३ हजार ८७४ झाली आहे. राजूरमध्ये सर्वाधिक कुपोषणअकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यातील कुपोषणाची टक्केवारी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. अकोले व राजूर असे दोन प्रकल्प अकोले तालुक्यात आहेत. त्यात राजूर प्रकल्पांतर्गत सर्वाधिक ५़८० टक्के बालके कुपोषित आढळून आली आहेत. त्याखालोखाल अकोले प्रकल्पात २़८६ टक्के बालके कुपोषित असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. वय, उंची वाढते; मात्र वजन घटतेबालकांची आरोग्य तपासणी करताना वयानुसार वजन आणि उंचीनुसार वजन घेतले जाते. वयानुसार वजन कमी असलेल्या बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर उंचीनुसार वजन कमी असलेल्या बालकांची संख्या तुलनेने नगण्य असल्याचे आढळून आले आहे. उंचीनुसार मध्यम कमी वजनाची २ हजार ७२६ तर तीव्र कमी वजनाची ५३४ बालके आढळून आली आहेत. वय, उंची वाढूनही वजन न वाढल्यामुळे ही बालके कुपोषित गृहित धरली जातात. त्यामुळे अंगणवाडी सेविकांमार्फत योग्य पोषण आहार पुरवून या बालकांना सुदृढ करण्यावर प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरchildren's dayबालदिन