संगमनेरातील पुरोहित प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ब्रह्मर्षी भगवान परशुराम जयंतीच्या ऑनलाइन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी, उपाध्यक्ष संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, विशाल जाखडी, सागर काळे, प्रतीक जोशी, वसंत कुलकर्णी यांसह समाजातील बंधू भगिनी यांनी ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते.
भगवान परशुराम शास्त्र आणि शस्त्र विद्येत निपुण होते. त्यांच्यात क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज यांचा संगम होता. अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी त्यांचा धारदार परशू चालवून अत्याचारी वृत्तीचा नायनाट करून पृथ्वी सुखी केली. आजही त्यांच्या तत्त्वाने ब्राह्मण समाज वाटचाल करीत आहे. ज्ञान, धैर्य, शौर्य प्रखर मातृभक्ती, तेजस्वी राष्ट्रभक्ती या गुणांच्या बळावर ब्राह्मण समाज अनेक वर्षांपासून भारतभूमीच्या उत्कर्षासाठी अविरत योगदान देत आला आहे व यापुढेही देत राहील. भारतीय लष्करात देखील मागील अनेक वर्षांपासून सातत्याने भरती होऊन प्रसंगी देशासाठी हौतात्म्य पत्करणारी अनेक धाडसी वीर जवान माणसे समाजाने राष्ट्रासाठी दिली आहेत. अनेकदा लष्कराच्या विविध विभागांना यशस्वी नेतृत्व दिले आहे. तसेच त्यागाची वेळ जेव्हा येते तेव्हा सर्वात पुढे असणारा हा समाज बुद्धिमत्ता, गुणवत्ता यांच्या बळावर भक्कम विश्वास ठेवणारा असल्याने सरकारकडून काहीही न मागता मी देशासाठी व इतरांसाठी काय देऊ शकतो, असा विशाल विचार करणारा आहे.’ असे प्रा. कुलकर्णी म्हणाल्या.
कार्यक्रमाचा शुभारंभ ब्रह्मर्षी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते करून वेदमंत्रांच्या घोषासह श्री रामरक्षा पठणाने करण्यात आला. उपाध्यक्ष वैद्य यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जाखडी यांनी प्रतिष्ठानच्या समाजोपयोगी कार्याची संक्षिप्त माहिती दिली. प्रा. कुलकर्णी यांचा परिचय विशाल जाखडी यांनी करून दिला. सागर काळे यांनी आभार प्रदर्शन केले. सामूहिक पसायदानाने करून कार्यक्रमाची सांगता झाली.