शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

ज्यांनी १५ वर्षात काहीच केले नाही, ते आता हल्लाबोल करतात - स्नेहलता कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 15:02 IST

गेल्या १५ वर्षामध्ये ज्यांना सर्वसामान्य जनतेसाठी काही करता आले नाही, तेच आज भाजप-शिवसेना सरकार विरूध्द हल्लाबोल करायला निघाले आहेत.

कोपरगाव : गेल्या १५ वर्षामध्ये ज्यांना सर्वसामान्य जनतेसाठी काही करता आले नाही, तेच आज भाजप-शिवसेना सरकार विरूध्द हल्लाबोल करायला निघाले आहेत. आधीच वेळोवेळी प्रश्न सोडविले असते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती, अशी टीका आमदार स्नेहलता कोल्हे यांनी माहेगाव देशमुख येथे केली.धरणगाव ते सुरेगाव या ११ किलोमीटर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे भूमीपूजन शुक्रवारी कोल्हेंच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात होते. व्यासपिठावर संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपान पानगव्हाणे, माहेगावचे संरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, ग्रा.पं. सदस्या वैशाली पानगव्हाणे, केशव भवर, के. पी. रोकडे, मच्छिंद्र केकाण आदी उपस्थित होते. कोल्हे म्हणाल्या, माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे तत्कालीन आघाडी सरकारच्या मंत्र्यांना पाणी प्रश्नावर वेळोवेळी बोलवत होते. तेंव्हा ते आले असते, तर आपल्या पदरात काही पडले असते. त्यामुळे आता हल्लाबोल करून काय साधणार आहे. निळवंडे धरणातुन शिर्डी ते पुढे कोपरगाव शहराला पाणी योजना आणल्याचे विरोधकांनी राजकारण केले. सिंचनाचे पाणी पळविले जात असल्याचा खोटानाटा कांगावा केला. परंतु त्यांच्या भुलथापांना कोणीही बळी पडणार नाही. न्याय देणारे जिथे आहेत, तेथे आपण थांबणार आहोत. कोणी कोणतीही आंदोलने केली तरी कोपरगावचे शेतकरी कामे करणारांमागेच उभे राहतात हे या मंडळींनी लक्षात ठेवावे. सरकारमध्ये असले तरी शेतकरी संपात सर्वप्रथम मी सहभागी झाले. शेतक-यांच्या प्रश्नांवर लढण्यास कधीही मागेपुढे पाहणार नाही. कर्जमाफीमध्ये शेतक-यांना समाधान देता आले, ही खुप मोठी गोष्ट आहे. आमदार म्हणून प्रत्येक गावाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला. अजुनही खूप कामे करायची आहेत. गेल्या तीन वर्षात तालुक्यात रस्ते, पाणी, विज ही मूलभूत विकासाची कामे केली. धार्मीक कार्यात येणा-या अडचणींवर मार्ग काढावे लागतील. मात्र कामे अडवून ठेवणा-या अधिका-यांची वेळीच दखल घेवू, असा इशारा कोल्हे यांनी दिला.सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी गावातील विविध समस्या मांडल्या. केषव भवर यांनी कोल्हे यांच्या तीन वर्षातील कामांची माहिती दिली. पी. आर. काळे यांनी गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी साठवण तलावाची मागणी केली. सार्वजनिक बांधकामचे सहाय्यक अभियंता संजय कोकणे यांनी प्रस्तावित रस्त्याचा लेखाजोखा मांडला. सूत्रसंचालन भागवत पानगव्हाणे यांनी केले. या प्रसंगी संजीवनीचे संचालक मनेश गाडे, षिवाजी निंबाळकर, षिवाजी कदम, दत्तात्रय पानगव्हाणे, भिमराज रोकडे, बेबी गोंधळे, सुर्यभान धिरोडे आदी उपस्थित होते.

आमदार हे आमच्या कामाचे माध्यम आहे. गावात केवळ भांडणे, मारामा-या होतात. विकासाचे एकही काम नाही. त्यामुळे आम्ही त्रासलो आहोत, आम्ही असे काय पाप केले? असा सवाल करून तुम्ही पष्चिम भागाकडे लक्ष द्या. माहेगाव देषमुख तुमच्या बरोबर आहे.-लक्ष्मण पानगव्हाणे, उपाध्यक्ष साईसंजीवनी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव