शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निविदांच्या छाननीसाठी महापालिकेत खलबते; सर्वपक्षीय नगरसेवकांची हजेरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 13:20 IST

जिल्हास्तर व दलितेतर कामांच्या निविदांची छाननी करण्याचा आग्रह धरत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेत हजेरी लावली. महापौरांच्या उपस्थितीत अधिकारी व नगरसेवकांत बंद दरवाजाआड झालेल्या चर्चेनंतर तातडीने छाननी करून निविदा अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांना सादर करण्यात आल्या. 

अहमदनगर : जिल्हास्तर व दलितेतर कामांच्या निविदांची छाननी करण्याचा आग्रह धरत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेत हजेरी लावली. महापौरांच्या उपस्थितीत अधिकारी व नगरसेवकांत बंद दरवाजाआड झालेल्या चर्चेनंतर तातडीने छाननी करून निविदा अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांना सादर करण्यात आल्या. 

जिल्हास्तर व दलितेतर योजनेंतर्गत महापालिकेत साडेआठ कोटींचा निधी मंजूर आहे. या निधीतून २९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. ही कामे करण्यासाठी बांधकाम विभागाने निविदा मागविल्या़ निविदा मागविताना डांबर प्लॅन्टची अट घालण्यात आली. ठेकेदारांनी तक्रार केल्यानंतर ही अट रद्द करण्यात आली. त्यामुळे या निविदा सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरल्या. 

दरम्यान कोरोनामुळे निविदाही लॉकडाऊन करण्यात आल्या. त्यामुळे या निविदांची पुढील कार्यवाही झाली नाही. त्यात सरकारने निधी परत मागविल्याने नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते. परंतु, प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही होत नसल्याने अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांनी महापौरांकडे तक्रार केली. 

या पार्श्वभूमीवर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सोमवारी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांची बैठक बोलविली. या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.  बराचवेळ झालेल्या चर्चेनंतर तातडीने छाननी करण्याचे काम हाती घेण्यात आले. दुपारपर्यंत तांत्रिक लिफाफे उघडून कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत संबंधित ठेकेदारांना कळविण्यात आले आहे. निविदा अंतिम मंजुरीसाठी सायंकाळी आयुक्तांना सादर करण्यात आल्या़  प्रस्ताव आयुक्तांना सादर केल्याची खात्री करून नगरसेवक निघून गेले. यापूर्वी  सर्वच पक्षांच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या.

 जिल्हास्तर व दलितेतर निविदांची छाननी करण्यासाठी लॉकडाऊनमुळे वेळ मिळाला नाही. त्यात शासनाचे वेगवेगळे आदेश प्राप्त झाले़ त्यामुळे विलंब झाला. सोमवारी छाननी करून निविदा अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांना सादर करण्यात आल्या आहेत़, असे प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका