शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनमधून आलेल्यांपैकी २० जण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

अहमदनगर : ब्रिटनमधून जिल्ह्यात आलेल्या २५ प्रवाशांपैकी २० जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी पाच जणांच्या अहवालाची ...

अहमदनगर : ब्रिटनमधून जिल्ह्यात आलेल्या २५ प्रवाशांपैकी २० जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी पाच जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

ब्रिटनमधील काही भागात कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू आढळला असून या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात आले. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात ब्रिटनमधून परतलेल्या व अहमदनगर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या २५ व्यक्तींची यादी जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात विशेष सर्वेक्षणाअंती १९ व्यक्ती या अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील तर ६ व्यक्ती ग्रामीण भागातील आढळून आलेल्या आहेत. या २५ व्यक्तींपैकी २० व्यक्तींची आर. टी. पी. सी. आर. तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरीत ५ व्यक्तींचे आर.टी.पी.सी.आर. तपासणीसाठी नमुने घेण्यात आले असून तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

---

२५ नोव्हेंबर २०२० नंतर ब्रिटनमधून परतलेले आहेत, अशांनी स्वतःहून अहमदनगर महानगरपालिका,

जिल्हयाच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकामी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करावा व सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करावे.

-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी