शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची हातसफाई, ट्रकचालकाची धुलाई, ‘सॅनिटायझर’चा ट्रकच पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 18:14 IST

कर्जत (जि. अहमदनगर) : नगर-सोलापूर महामार्गाहून २१ लाख ९० हजार रूपयांचे सॅनिटायझर घेऊन चाललेला ट्रक पाटेवाडी शिवारात (ता. कर्जत) अडवून चौघांनी पळवून नेला. चालक, वाहकाला मारहाण करून लुटीची ही घटना बुधवारी रात्री घडली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत (जि. अहमदनगर) : नगर-सोलापूर महामार्गाहून २१ लाख ९० हजार रूपयांचे सॅनिटायझर घेऊन चाललेला ट्रक पाटेवाडी शिवारात (ता. कर्जत) अडवून चौघांनी पळवून नेला. चालक, वाहकाला मारहाण करून लुटीची ही घटना बुधवारी रात्री घडली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे ट्रकमध्ये (क्र. २८ बी. ए. १६९४) २१ लाख ९० हजार रूपयांचे सॅनिटायझर भरण्यात आले होते. तो ट्रक नगर-सोलापूरमार्गे केरळ राज्यातील त्रिवेंद्रम येथे सॅनिटायझर घेऊन चालला होता. ट्रकमध्ये केवळ चालक, वाहक असे दोघेच होते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारातील वळणावर गतिरोधक आहे. तेथे ट्रकचा वेग कमी झाल्यानंतर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी ट्रक अडविला. काही कळायच्या आतच त्यांनी चालक, वाहकाला खाली उतरवून बेदम मारहाण केली. त्या दोघांना धमकी देऊन ते लुटारू सॅनिटायझरसह ट्रक घेऊन सोलापूरच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणी ट्रकचालक मनीवेल पेरूमल (वय ५२, रा. मुथ्थू हापट्टी, ता. जि. नामक्कल, तामिळनाडू) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ट्रकमधील २१ लाख ९० हजार रूपयांच्या सॅनिटायझर बॉटल, १० लाख रूपयांचा ट्रक, अशी त्या चोरांनी बत्तीस लाख रूपयांची लूट केली. घटनास्थळाला वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी भेट दिली.