शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

'एलसीबी'चे कर्मचारी असल्याचे सांगत चोरट्यांनी भरदिवसा उद्योजकाला लुटले,शहरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 15:45 IST

अहमदनगर: 'एलसीबी'चे कर्मचारी असल्याचे सांगत नगर शहरात भरदिवसा दोघा चोरट्यांनी उद्योजकाला मारहाण करत त्याच्याकडील 1 लाख 20 हजार हजार 200 रुपये हिसकावून नेले. शनिवारी (दि.20) दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास शहरातील गंगाउद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत ही घटना घडली. याप्रकरणी अमित ज्ञानेश्वर सुंकी (वय 31 रा. श्रमिक नगर अहमदनगर)  यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अहमदनगर: 'एलसीबी'चे कर्मचारी असल्याचे सांगत नगर शहरात भरदिवसा दोघा चोरट्यांनी उद्योजकाला मारहाण करत त्याच्याकडील 1 लाख 20 हजार हजार 200 रुपये हिसकावून नेले. शनिवारी (दि.20) दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास शहरातील गंगाउद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत ही घटना घडली. याप्रकरणी अमित ज्ञानेश्वर सुंकी (वय 31 रा. श्रमिक नगर अहमदनगर)  यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सुंकी यांची नगर एमआयडीसी येथे बालाजी इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. ते शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोटरसायकलवरून गंगा उद्यान परिसरातून जात होते. याचवेळी युनिकॉर्न या मोटरसायकलवरून दोन जण आले. त्यांच्या मोटारसायकलला फायबरचे दांडके लावलेले होते. त्यांनी सुंकी यांची गाडी थांबविली व आम्ही एलसीबीचे कर्मचारी आहेत असे सांगितले.

त्यानंतर सुंकी यांना त्यांची मोटरसायकल गंगाउद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत घेण्यास सांगितली. हे दोघे चोरटे पोलीस असल्याचा समज झाल्याने सुंकी यांनी मोटारसायकल मैदानाकडे नेली. मैदानात गेल्यानंतर  या दोघांनी सुंकी यांना हाताने व लाथाने मारून त्यांच्या खिशातील पैसे हिसकावून नेले. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळंके हे करत आहेत.

----------------------

तोफखाना पोलिसांकडून चौफेर तपास

लुटमारीची घटना घडल्यानंतर अमित सुंकी यांनी  शनिवारी रात्री आठ वाजता तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तोफखाना पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास सुरू केला असून चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केले आहेत. घटना घडली त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.