शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगर शहरात लुटारूंचा धुमाकूळ : एटीएमकार्डात हेराफेरी करून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 12:36 IST

एटीएम कार्डात हेराफेरी करून बँक ग्राहकांचे पैसे लुटणारी टोळी नगर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत असून, या चोरट्यांनी दोन दिवसांत तिघांना ८५ हजार रूपयांना गंडा घातला. सहा ते सात जणांची ही टोळी अद्यापर्यंत पोलीसांच्या रडावर कशी येईना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अहमदनगर : एटीएम कार्डात हेराफेरी करून बँक ग्राहकांचे पैसे लुटणारी टोळी नगर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत असून, या चोरट्यांनी दोन दिवसांत तिघांना ८५ हजार रूपयांना गंडा घातला. सहा ते सात जणांची ही टोळी अद्यापर्यंत पोलीसांच्या रडावर कशी येईना असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातील भिस्तबाग येथील स्वरूप मोहनलाल सुतार (वय १९) हा मंगळवारी सकाळी चांदणी चौक येथून स्टेट बँकेकडे पैसे डिपॉजिट करण्यासाठी जात होता. पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी स्वरूप याला हेरले. टोळीतील एकाने स्वरूप याच्याशी चर्चा करून मलाही पैसे डिपॉजिट करायचे आहेत. पण येथील एटीएम कार्ड बंद आहे. त्यामुळे दुसऱ्या एटीएम कार्डमधून मी आॅनलाईन मी पैसे डिपॉजिट करतो. माझ्याकडे रोख ५० हजार रूपये आहेत. हे पैसे तुमच्याकडे ठेवा आणि तुझ्याकडील २० हजार रूपये व एटीएम कार्ड माझ्याकडे द्या असे म्हणून तो स्वरूप याचे एटीएम कार्ड व २० हजार रूपये घेऊन गेला. स्वरूप याच्याकडे दिलेला ५० हजार रूपयांच्या बंडलमध्ये वरती एक पाचशे रूपयांची नोट तर खाली सर्व कागद जोडलेले होते.  या चोरट्यांनी स्वरूप याच्या एटीएम कार्डमधून २२ हजार २०० रूपये काढून घेतले.शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेत असलेला रवीकुमार सुभाष राठोड (रा. तुळजापूर) हा बुधवारी पैसे काढण्यासाठी येथील स्टेट बँक चौकातील एटीएममध्ये आला होता. रवीकुमार याने मशीनमध्ये एटीएम टाकले मात्र त्याचे पैसे निघाले नाहीत. त्याच्या पाठीमागे उभा असलेल्या चोरट्यांने त्याच्या एटीएमचा चोरून कोड क्रमांक पाहिला होता. त्या चोरट्याने रवीकुमार याला मी पैसे काढून देतो असे म्हणून रवीकुमार याच्याकडून एटीएमकार्ड घेतले. तसेच त्याची नजर चुकवून त्याला त्याच बँकेचे दुसरे एटीम कार्ड दिले. त्यानंतर काही वेळातच रवीकुमार याच्या खात्यातून दुस-या एटीएममधून चोरट्यांनी २५ हजार रूपये काढून घेतले.रवीकुमार याची सर्वसामान्य परिस्थती असून, विद्यालयातील फी भरण्यासाठी त्याने हे पैसे बँकेत ठेवले होते.या प्रकरणी स्वरूप सुतार व रवीकुमार राठोड यांनी भिंगार कॅम्प पोलीस सठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.चास येथील वाहनचालकाची फसवणूकराठोड याच्या एटीएममधून पैसे काढून घेतल्यानंतर हेच चोरटे शहरातील संकेत हॉटेल जवळील एक्सेस बँकेच्या एटीएममध्ये गेले. तेथे वाहन चालक मधुकर ताताब्या गायकवाड (वयय ३८ रा.चास ता.नगर) हे पैसे काढण्यासाठी आले होते. गायकवाड हे पैसे काढत असताना एका चोरट्याने मी तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणून त्यांचे एटीएम कार्ड घेतले व त्याचा पीन क्रमांकमही घेतला़ गायकवाड यांना रविकुमार राठोड याचे एटीएम दिले. आणि गायकवाड यांच्या एटीएममधून १८ हजार रूपये काढून घेत पोबारा केला.पैसे चोरण्याची अशी पद्धतएटीएम कार्डांची फेराफेरी करून पैसे लुटणारी सहा ते सात जणांची स्थानिक टोळी आहे. शहरातील माळीवाडा, पुणे, स्टेट बँक चौक, सहकार सभागृह, जिल्हा परिषद आदी ठिकाणी असलेल्या एटीएम परिसरात हे चोरटे उभा राहतात. एखादा व्यक्ती एटीएम कार्डमध्ये पैसे काढण्यासाठी गेला तर पाठीमागून तीन ते चार जण सोबत जातात.तेथे थोडी गडबड करून बोलण्याचा प्रयत्न करतात. बोलण्याच्या नादात एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे काढून घेतात. हे काम अतीय चाणाक्ष पद्धतीने करतात. गेल्या सहा महिन्यांत अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक झालेली आहे.चोरटे सीसीटिव्हीत कैदबँक ग्राहकांची फसवणूक करणारे चोरटे दोन एटीएम कार्डमधील सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. पोलीसांनी हे फुटेज घेतले आहे.या चोरट्यांचा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक संदीप पाटील यांच्यासह एक पथक शोध घेत आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस