शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ पुन्हा सेनेत थारा नाही

By admin | Updated: July 25, 2016 00:06 IST

जामखेड : जामखेड नगरपरिषद निवडणुकीनंतर ज्यांनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला अशांना पुन्हा शिवसेनेत थारा नाही.

जामखेड : जामखेड नगरपरिषद निवडणुकीनंतर ज्यांनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला अशांना पुन्हा शिवसेनेत थारा नाही. जर त्यांना शिवसैनिक म्हणून रहायचे असेल तर समस्त शिवसैनिकांची माफी मागून स्थानिक सत्तेतून बाहेर पडावे, असा सल्लाही शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दिला. जामखेड येथे आयोजित मेळाव्यात नगर महापालिकेच्या महापौर सुरेखा कदम यांचा कोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी शिवसेना नेते रमेश खाडे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, कर्जत -जामखेड संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र दळवी, नगरशहर प्रमुख संभाजी कदम, जि. प. सदस्य शहाजी राळेभात, तालुकाप्रमुख संभाजी राळेभात, उपप्रमुख मोहन जाधव, शहरप्रमुख संजय काशीद, अविनाश बेलेकर, जयसिंग डोके, तालुका संघटक हिंदूराज मुळे आदी उपस्थित होते. प्रारंभी महापौर सुरेखा कदम व सेना पदाधिकारी यांची शहरातून मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले़ शिवसेना नेते रमेश खाडे म्हणाले, जामखेडमध्ये सुरुवातीला आम्ही शिवसेनेचे रोपटे लावले़ आता त्याचा वटवृक्ष झाला आहे. काही नाराज आहेत, त्यांना बरोबर घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिंकायची आहे. तालुक्यातील शिवसैनिकांच्या पाठिशी मी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या मदतीसाठी तयार असल्याचे खाडे म्हणाले. जि. प. सदस्य शहाजी राळेभात म्हणाले, सेनेचे जुने नेतृत्व शिवसैनिकांपर्यंत पोहचत नव्हते म्हणून सेनेची वाढ तालुक्यात झाली नाही. आता आम्ही गावागावात, वाड्यावस्त्यावर शिवसेनेच्या शाखा उघडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे़महापौर कदम म्हणाल्या, महापौर झाल्यानंतर पहिलाच मोठा सत्कार जामखेड तालुक्याने केला आहे. त्यामुळे मी आजच महापौर झाले आहे, असे वाटते. यापुढील काळात महापालिकेच्या वतीने जामखेड तालुक्याला सर्वतोपरी मदत करू. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला़ कोरगावकर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, डॉ. विजय पाटील, प्रदीप भोरे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन गणेश हगवणे यांनी केले़ उपप्रमुख भारत चव्हाण यांनी आभार मानले.