घरफोडी करून २० हजार चोरले
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मढी येथे चोरट्यांनी घरफोडी करून २० हजार रुपये चोरून नेले. १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात शरद तुकाराम मरकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक नवगिरे हे पुढील तपास करत आहेत.
मोटारसायकल चोरली
अहमदनगर : शहरातील पाईपलाईन रोडवरील नम्रता कॉलनी येथून चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेली. ८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जालिंदर आसाराम साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक आंधळे हे पुढील तपास करत आहेत.
केबल चोरली
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील मुळा धरणगाव येथून चोरट्यांनी १० हजार रुपयांची केबल चोरून नेली. १२ ते १३ फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी दिपक दत्तात्रय खिलारी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक जाधव हे पुढील तपास करत आहेत.