शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

या ‘तीन’ गोष्टीने वाढते इम्युनिटी, कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:10 IST

कोरोनाचा रुग्ण बरा होऊन घरी परतला जातो, तेव्हा त्याला तीन बाबींची अंमलबजावणी करण्याचा कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून हमखास सल्ला दिला जातो. शेवग्याच्या शेंगाची भाजी, कच्चे टोमॅटो आणि गरम पाणी सतत पित रहा, असे सांगितले जाते. याशिवाय कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबाबतही सांगण्यात येते, असे एका बऱ्या झालेल्या रुग्णाने सांगितले.

सुदाम देशमुख

अहमदनगर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होऊन घरी जाणाºया रुग्णांचेही मोठे प्रमाण आहे. हे प्रमाण तब्बल ८१ टक्केइतके आहे. बाधितांची संख्या एकीकडे वाढत असली तरी बरे होणाऱ्यांची दुसरीकडे संख्या वाढत आहे. यामुळे केवळ १७ टक्केच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.बरे झालेल्या ८१ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने ते पाच ते सात दिवसांच्या आतच घरी जात असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज पाचशेपर्यंत जाते. त्यामुळे जिल्ह्यात भितीदायक वातावरण आहे. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणा सांगत आहे.

अशा लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. तेथे त्यांची चहा, नाश्ता, जेवण, व्यायामाची व्यवस्था केली जाते. इम्युनिटी वाढविणारी औषधे दिली जातात. त्यामुळे रुग्णाला पाच दिवस कोविड सेंटरमध्ये ठेवले जात आहे. पाच दिवसानंतर आणखी पाच ते सात दिवस घरी थांबण्याचासल्ला दिला जातो. त्यानंतर तो रुग्ण दहा दिवस होम क्वारंटाईन असतो. बारा दिवसानंतर त्याला समाजात वावरण्याची परवानगी दिली जाते.जून, जुलैमध्ये कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या पाचशे ते एक हजारांच्या आत होती. जुलैच्या मध्यापासून ते आॅगस्टच्या मध्यापर्यंत ही संख्या वाढून थेट १७ हजारांच्यावर गेली आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. मात्र बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ८१ टक्क्यांच्यावर गेल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेचाही जीव भांड्यात पडला आहे.----------------सुरवातीच्या काळात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार कसे करावेत, याबाबत डॉक्टरांकडे फारसे अनुभव नव्हते. आता उपचार पद्धतीत सुधारणा झाली आहे. तसेच ९० टक्के रुग्णांना लक्षणेही आढळून येत नाहीत. तरीही अशा पॉझिटिव्ह रुग्णांना इम्युनिटी वाढविण्याची औषधेही उपलब्ध झाली असून ती दिली जात आहेत. या सर्वांचा एकत्रित परिमाण म्हणून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून ही चांगली बाब आहे.-डॉ. सुनील पोखरणा, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या