शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है; अहमदनगर येथे ४०५ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 17:13 IST

‘जिंदगी की असली उडाण अभी बाकी है, हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, आगे सारा आसमान अभी बाकी है’ या बुलंद आत्मविश्वासाने देशाचे भावी सैनिक देशसेवेसाठी सज्ज झाले.

अहमदनगर : ‘जिंदगी की असली उडाण अभी बाकी है, हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, आगे सारा आसमान अभी बाकी है’ या बुलंद आत्मविश्वासाने देशाचे भावी सैनिक देशसेवेसाठी सज्ज झाले.एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण केंद्रातून तब्बल ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण घेऊन ४०५ छात्रांनी सैन्यदलात प्रवेश केला. एमआयआरसी येथे शनिवारी (दि. ३) भल्या सकाळी झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात या छात्रांनी आपापल्या धर्मगुरूंकडून देशसेवेची शपथ घेतली. तत्पूर्वी छात्रांनी शानदार संचलनाने लेफ्टनंट जनरल पी. सी. थिमैया, एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रमण्यम व कर्नल रिसेल डिसुजा यांना सलामी दिली.भल्या सकाळी एमआयआरसीच्या अखोरा ड्रिल मैदानावर सैनिक बँडच्या आवाजात लयबद्ध संचलन करून छात्र जवानांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. परेड निरीक्षकांच्या आवाहनानुसार छात्रांनी मैदानात फेरी मारली. लेफ्टनंट जनरल थिमैया यांनी उघड्या जीपमधून परेडचे निरीक्षक केले. जवानांनी आपापल्या धर्मगुरूंकडून धर्मग्रंथावर हात ठेवत सदैव देशरक्षणाची शपथ घेतली.जवानांना संबोधित करताना थिमैया म्हणाले, की देशाचे रक्षण करणे हे सैनिकाचे प्रथम कर्तव्य असते. त्यासाठी प्राणाची बाजी लागली तरी हरकत नाही. वीरता आणि विश्वास या दोन शब्दांना पुढील आयुष्यात सार्थ ठरवा. आपल्या नागरिकांचे व देशाचे रक्षण करून जवानांनी सर्वच क्षेत्रात नाव उंचवावे. येथील अधिकाºयांनी उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन या जवानांचे सामान्य नागरिकातून सक्षम सैनिकात रूपांतर केले आहे. त्यामुळे या युवा जवानांच्या खांद्यावर देशाचे भविष्य सुरक्षित असल्याचा विश्वास थिमैया यांनी व्यक्त केला.

उत्कृष्ट तीन छात्रांचा गौरव

या प्रशिक्षणादरम्यान ४०५ छात्रांमधून तिघांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यामुळे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यात नंदन सिंह याला जनरल सुंदरजी सुवर्णपदक, विक्रम सिंह जैस्वाल याला जनरल के. एल. डिसुजा रौप्यपदक, तर हरजित सिंह याला जनरल पंकज जोशी कांस्यपदकाने सन्मानित करण्यात आले.

पालकांचाही सन्मान

पासिंग आऊट परेडनंतर छात्रांच्या पालकांचा यथोचित गौरव करण्यात आला. देशासाठी आपला मुलगा समर्पित केल्याची भावना त्यांच्या चेह-यावर साफ दिसत होती. अधिका-यांनी प्रत्येक पालकाचा पदक देऊन सन्मान केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndian Armyभारतीय जवान