शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाटील, विखे, नागवडे, जगताप यांच्यात श्रीगोंद्यात राजकीय खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 15:32 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे़ परंतु, रविवारी नागवडे कारखान्यांवर माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, विखे, नागवडे, जगताप यांच्या एकत्रित बैठकीने नव्या चर्चेला उधान आले आहे़ 

श्रीगोंदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे़ परंतु, रविवारी नागवडे कारखान्यांवर माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, विखे, नागवडे, जगताप यांच्या एकत्रित बैठकीने नव्या चर्चेला उधान आले आहे़  राज्य साखर संघाचे अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने कारखान्यावर नेत्यांची मांदियाळी जमली होती.नागवडे साखर कारखान्याच्या विश्रामगृहात बंद खोलीत सुरुवातीला माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुजय विखे, कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, दीपक नागवडे यांच्यात बैठक झाली.  त्यानंतर आमदार राहुल जगताप यांना बोलविण्यात आले. बंद खोलीत काय चर्चा झाली हे समजले नसले तरी हर्षवर्धन पाटील हे भाजपाच्या उंबरठ्यावर आहेत. नागवडे  हेही भाजपा नेत्यांशी संपर्कात आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी सुरुवातीला विख-नागवडे यांच्यात संवाद घडवून आणला. त्यानंतर आमदार जगताप यांना बैठकीत बोलविले. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्या शब्दांवर खा. सप्रिया सुळे यांना मदत केली. पण  विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर मतदारसंघावर दावा केला़ परंतु,  प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी स्पष्ट धोरण घेतले नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे. त्यावर पाटील यांनी भाजपाशी मैत्री करून इंदापूरमध्ये युती पुरस्कृत उमेदवारी करण्याची व्यूहरचना आखली आहे़ दरम्यान खासदार विखे यांच्या उपस्थित श्रीगोंद्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे श्रीगोद्यात नवे राजकीय समीकरणे जुळण्याची चिन्हे आहेत़ 

 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर