शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 11:42 IST

विरोधी उमेदवार वैयक्तिक टीका करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत़ कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही,

पारनेर : विरोधी उमेदवार वैयक्तिक टीका करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत़ कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, अशी टीका महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी विरोधकांवर केली.पारनेर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते़ विधानसभेचे उपसभापती विजय औटी, सभापती राहुल झावरे, दिनेश बाबर, डॉ. भास्कर शिरोळे, सचिन वराळ, काशिनाथ दाते, रामदास रोहकले, विश्वनाथ कोरडे, सुवर्णा वाळुंज यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयाचा लाभ आज देशातील शेतकऱ्यांना होत आहे़ चालूवर्षी ५० हजार मेट्रीक टन कांदा नाफेडने खरेदी केल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ यासंदर्भात शाश्वत धोरण घेण्यासाठी संसदेत पाठपुरावा करणार असल्याचे विखे म्हणाले़ लोकसभेची निवडणूक विचारांवर आधारित आहे. शेती, पाणी आणि रोजगार या प्रश्नांवर भूमिका सुरुवातीपासूनच मांडत आहे़ त्यासाठी विचारांचा वारसा लागतो़ सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्याची हिंमत लागते. विरोधी उमेदवार वैयक्तिक टीका करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत़ कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही. काम करण्याची संधी जनतेने त्यांना दिली होती, पण जनतेचे प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले नाही, अशी टीका विखे यांनी संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019