शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाव नसल्याने श्रीरामपुरातील शेतक-याने टोमॅटोच्या पिकात वाजत-गाजत सोडल्या मेंढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 17:57 IST

शेतातील कोबी, फ्लॉवरनंतर भाव नसल्याने टोमॅटोच्या पिकातूनही खर्च फिटला नाही. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या युवा शेतक-याने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वाजत-गाजत व फित कापून मेंढ्यांचा कळप उभ्या पिकात घातला.

ठळक मुद्दे शिरसगावच्या शेतकऱ्याचे अनोखे आंदोलनवाजत-गाजत, फित कापून सोडल्या मेंढ्यापैसे नसल्याने मुलीला सहलीला जात आले नाही

श्रीरामपूर : शेतातील कोबी, फ्लॉवरनंतर भाव नसल्याने टोमॅटोच्या पिकातूनही खर्च फिटला नाही. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या युवा शेतक-याने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वाजत-गाजत व फित कापून मेंढ्यांचा कळप उभ्या पिकात घातला. पाचवीच्या वर्गात शिकणारी या शेतक-याची मुलगी ईश्वरी हिने वडिलांची आर्थिक फरपट पाहता सहलीला जाण्यासाठी मी मनाला मुरड घातल्याचे सांगितले. यावेळी सर्व उपस्थित भावूक झाले.श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील शेतकरी नितीन बाबासाहेब गवारे यांनी आपल्या शेतातच शनिवारी हे आंदोलन केले. त्यांना आई, वडील, पत्नी व एक मुलगा मुलगी असा परिवार आहे. विशेष म्हणजे नितीन हे पदवीधर तर त्यांच्या पत्नी या पदव्युत्तर पदवीधर आहेत. गवारे यांना तीन एकर जमीन आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागविण्याकरिता त्यांना भाजीपाल्याची पिके घ्यावी लागतात. नुकतेच कोबी आणि फ्लॉवरच्या घेतलेल्या पिकातून उत्पादन खर्च निघाला नाही. मजुरी व वाहतुकीचा खर्च वजा जाता बाजारात विक्री परवडत नसल्याने जनावरांना पिक खाऊ घातले. टोमॅटो एक ते दीड रूपया किलोने विकला जातो आहे. अखेर या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन केल्याचे गवारे यांनी सांगितले. श्रीरामपूरसह नेवासा व राहाता तालुक्यातील शेतकरी ही सहभागी झाले होते. फीत कापून मेंढ्यांना टोमॅटोच्या पिकात सोडण्यात आले. आंदोलनाचे कुठल्याही स्वरूपाचे निवेदन पोलीस व प्रशासनाला दिले नाही. त्यामुळे शहर पोलिसांनी आंदोलन करता येणार नाही, असे आदेश दिले. मात्र आपलेच शेत व आपलेच पिक असल्याने परवानगीची गरजच काय? असा उलट सवाल गवारे यांनी यावेळी केला. आंदोलनस्थळी अनेक शेतक-यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. २०० ते ३०० शेतकरी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर