शेवगाव : जनतेच्या आशीर्वादामुळे मिळालेली सत्ता हा वैयक्तिक मोठेपणा नाही तर समाजातील गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मानण्याची शिकवण लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील, ज्येष्ठ बंधू व मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले यांच्याकडून मिळाली त्याप्रमाणे आपले काम सुरू आहे. आपण सतत जनतेमध्ये आहोत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आपल्याला चिंता नसल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.तालुक्यातील दहिगावने येथे आ. घुले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या भेटीसाठी तालुक्यातील विविध मान्यवरांसह नागरिकांनी हजेरी लावली. यावेळी म्हणाले, घुले परिवाराचे राजकारण स्वच्छ, पारदर्शी व सतत जनतेच्या जिव्हाळ्याचे राहिले आहे. शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, सर्वसामान्य मनुष्य हा केंद्रस्थानी मानून त्यांच्या कल्याणाकरिता आपला प्रयत्न आहे. स्व.घुले पाटील यांची ही शिकवणूक आहे. त्यामुळे निवडणूक व त्यातील जय पराजयाची आपल्याला अजिबात चिंता नाही. जनता हीच आपला प्राण असल्याने निवडणुकीबाबत आपण निर्धास्त असल्याचा ठाम निर्धार घुले यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, ज्ञानेश्वरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ कातकडे, उपसभापती अरुण पाटील लांडे, अॅड. अण्णासाहेब धस, संदीप कोळगे, ताहेर पटेल, डॉ. मेधा कांबळे, लीला मुंदडा, अंबादास कळमकर, माधव काटे, बबनराव भुसारी, संपतराव नेमाणे, सागर फडके, संजय फडके, एजाज काझी, हरिष भारदे, राहुल मगरे, प्रा.शाहुराव घुटे यांनी आ. घुले यांची भेट घेतली. (तालुका प्रतिनिधी)
निवडणुकीची चिंता नाही
By admin | Updated: August 17, 2014 00:04 IST