शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणात सव्वा महीना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:41 IST

दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

राहुरी: दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आज उजवा कालवा बंद करण्यात आला आहे. शेवटच्या उन्हाळी अवर्तनात ४० दिवसांमध्ये ५ हजार दशलक्ष्यघनफुट पाण्याचा वापर झाला आहे. सद्यस्थितीत धरणात पिण्यायोग्य पाण्याचा साठा ३१३ दलघफु असून हा पाणीसाठा महीनाभर पुरेल, असे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले. २६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात ४ हजार ८१३ दलघफु पाणी शिल्लक आहे़ मृत पाणी साठा ४५०० दलघफु आहे. दररोज ८ दलघफु पाणी खर्च होत आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही.मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखाली २७९ पाणी वापर सहकारी संस्था आहे. पाणी वाटप संस्थेच्या माध्यमातुन शेतीसाठी पाणी वाटप करण्यात आले आहे. उजव्या कालव्याखाली किती क्षेत्र भिजले याबाबत पाटबंधारे खात्याकडे आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. सलग दोन वर्ष मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. गेल्या वर्षी धरणावर ७८० मिलीमिटर पाऊस पडला. त्यामुळे धरणाच्या ११ मो-यातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले होते. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर यंदा पावसाचे प्रमाण घटण्याची चिन्हे आहेत.  त्यामुळे यंदा मुळा धरण भरणार का याबाबत शेतक-यांमध्ये उत्सुकता आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही. १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे. - रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी