शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अख्या गावात उरल्या अवघ्या अकरा बैलजोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 14:03 IST

कुकडी लाभक्षेत्रातील बागायतदारांचे गाव अशी ओळख असलेल्या लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील शेती  व्यवसायाची पाण्याअभावी वाताहत झाली आहे. सततची दुष्काळी स्थिती, पशुखाद्याचे वाढते दर आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे गावात अवघ्या ११ बैलजोड्या उरल्या आहेत. हे वास्तव शनिवारी म्हणजे भाद्रपदी बैल पोळ्याच्या दिवशी उघड झाले. 

बाळासाहेब काकडे ।  श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रातील बागायतदारांचे गाव अशी ओळख असलेल्या लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील शेती  व्यवसायाची पाण्याअभावी वाताहत झाली आहे. सततची दुष्काळी स्थिती, पशुखाद्याचे वाढते दर आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे गावात अवघ्या ११ बैलजोड्या उरल्या आहेत. हे वास्तव शनिवारी म्हणजे भाद्रपदी बैल पोळ्याच्या दिवशी उघड झाले. लोणीव्यंकनाथ गावची लोकसंख्या १२ हजार आहे. मनमाड-फलटण राष्ट्रीय महामार्गावरील हे गाव आहे. या गावाची शेती क्षेत्रही मोठे आहे. गावचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी बैलांच्या सहायाने शेतकरी शेतीची मशागत, पेरणी करीत होते. त्यामुळे ५०० हून अधिक बैलजोड्या गावात होत्या. दिवसेंदिवस येथील नियमित शेतीसाठी मिळणारे पाणी कधी तरी मिळू लागले. त्याचा फटका शेती उद्योगाला बसला. तसेच काही वर्षांच्या अंतराने सारखा दुष्काळही पडत आहे. पशुखाद्याचा भावही वाढला आहे. त्यामुळे शेतक-यांना बैलजोड्या सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. तरी काही शेतकरी परंपरा कायम राखण्याठी तर काहीजण हौसेखातर बैलजोडी सांभाळत आहेत.  लोणी व्यंकनाथ येथे भाद्रपदी पोळा साजरा केला जातो. शनिवारी सायंकाळी येथे बैलजोड्या पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. पण मिरवणुकीसाठी गावात अवघ्या अकराच बैलजोड्या आल्या. बैलजोड्या कमी झाल्याने बैल सजविण्याचा अगर बैलांसाठी लागणारे दैनंदिन साहित्यांचा व्यवसाय संपला आहे. ही चिंतेची बाब आहे. काही दिवसांनी बैलांचे आठवडे बाजारही बंद पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.  बैलजोडी सांभाळणे अवघड.. बैलजोडी सांभाळणे सध्या खूप अवघड झाले आहे. दररोज काम नसेल तर चा-याचा खर्चही परवडत नाही. त्यामुळे बैलजोडी सांभाळणे शेतक-यांना परवडत नाही. तरी हौस म्हणून काही शेतकरी बैलजोडी पाळीत आहेत ही वस्तुस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांना निसर्गाचीही साथ मिळत नाही. शेती व्यवसायातही अनंत अडचणी आहेत, असे येथील शेतकरी उद्धव काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर