शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
2
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
3
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
4
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
5
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
6
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
7
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
8
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
9
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
11
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
12
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
13
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
14
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
15
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
16
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
17
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
18
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
19
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
20
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही

तीनशेहून अधिक वर्गांना गुरुजीच नाहीत

By admin | Updated: July 1, 2017 13:31 IST

जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले़ मात्र शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ संपलेला नाही़

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले़ मात्र शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ संपलेला नाही़ त्यामुळे शिक्षकांचे २९७ पदे रिक्त राहिले असून, तीनशेहून अधिक वर्गांना शिक्षकच नाहीत़ तसेच दुसऱ्या शाळेत बदली होण्याच्या भीतीने अनेकांना तर जिल्हांतर्गत बदल्यांच्या चिंतेने काहींना ग्रासले आहे़ त्यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरू आहे़ गेल्या १५ जूनला जिल्हा परिषद शाळांची घंटा वाजली़ शाळा सुरू होण्याआधीच बदल्यांची प्रक्रिया पार पडेल, अशी अपेक्षा होती़ मात्र जून महिना संपूनही शिक्षकांच्या बदल्या व पदोन्नत्यांचा गोंधळ सुरूच आहे़ पुढील जुलैअखेर हा गोंधळ अधिक वाढण्याची चिन्हे आहेत़ जिल्हा परिषद शिक्षकांची १८३ पदे पूर्वीपासून रिक्त आहेत़ त्यात मागील आठवड्यात ११४ शिक्षकांना पदोन्नत्या मिळाल्या़ त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली़ त्याचा भार इतर शिक्षकांवर पडला़ अंतर जिल्हा वापसी बदलीने १०५ शिक्षक मे महिन्यात जिल्हा परिषदेत हजर झाले़ पण, त्यांची अद्याप शाळेवर नियुक्ती झाली नाही़ हजर होऊन दोन महिने उलटून गेले तरी ते जिल्हा परिषदेतच अडकून पडले आहेत़ ते जिल्हा परिषदेत हजेरी लावून घरचा रस्ता धरतात़ शाळेतवर नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी ते जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडे मागणी करत आहेत़ पण, जिल्हांतर्गत बदल्या होऊ द्या, त्यानंतरच तुमची शाळेवर नियुक्ती होईल, असे त्यांना सांगितले जात आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेत येऊन हजेरी लावतो आहे़ तिकडून सुटल्यानंतर लगेच हजर झाले़ उन्हाळ्याच्या सुट्ट्याही गेल्या़ आता शाळा सुरू झाल्या़ अजूनही नियुक्ती नाही़ इतर जिल्ह्यांतील शिक्षक शाळेवरही हजर झाले आहेत़ मात्र या जिल्हा परिषदेनेच अद्याप शिक्षकांना नियुक्त्या दिल्या नाहीत़ त्यामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाचेही वांधे झाल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे़

जिल्हांतर्गत बदल्यांना मिळेना मुहूर्त

शाळा सुरू होण्याआधी ३१ मे पूर्वी शिक्षकांच्या बदल्या होत असतात़ यंदा मात्र तसे झाले नाही़ जुलै महिन्यातही बदल्यांचा गोंधळ सुरूच असून, जिल्हांतर्गत बदल्या लांबणीवर पडल्या आहेत़ या बदल्या होणार असल्याने शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले आहेत.

वर्ग सांभाळण्याची कसरत

जिल्ह्यातील तीनशेहून अधिक वर्गांवर गुरुजींची नियुक्तीच करण्यात आली नाही़ त्यामुळे एका शिक्षकाला दोन वर्ग सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे़ तसेच काही शिक्षकांना पदोन्नत्या मिळाल्या़ मात्र, तेथे सहशिक्षकाची नियुक्तीच नाही़ त्यामुळे पदोन्नती झालेल्यांना वर्ग सांभाळण्यासह पदोन्नतीचीही जबाबदारी पार पाडावी लागत आहे़

आॅनलाईन बदल्यांचा विद्यार्थ्यांना फटका

आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या आॅनलाईन केल्या जाणार आहेत़ आंतर जिल्हा बदलीने ६२१ शिक्षक येणार असल्याचे समजते़ परंतु, ते अद्याप हजर झालेले नाहीत़ पण, जिल्हांतर्गत बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया चालू महिन्यात सुरू होणार आहे़ या बदल्यांमध्ये चार संवर्गांच्या बदल्या होणार आहेत़ एका प्रवर्गासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागेल़ त्याचा परिणाम शिक्षणावर होणार आहे़

आंतरजिल्हा आपसी बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

आंतरजिल्हा बदल्यांच्या सन २०१५ मध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी चालूवर्षी झाली़ नगर जिल्हा परिषदेने शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचे पत्र इतर जिल्हा परिषदांना दिले़ मात्र त्यावर पदस्थापनेचा उल्लेख नव्हता़ कार्यमुक्त करण्याच्या पत्रावरच शिक्षक आले़ सुरुवातीला आकृतीबंध पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती करू, असे सांगण्यात आले़ त्यानंतर पदोन्नत्या झाल्यानंतर देऊ, असे सांगितले गेले़ पदोन्नत्याही झाल्या़ परंतु, अद्याप शाळेवर नियुक्ती नाही़