शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

...तर ठाकरे सरकार लवकरच कोसळेल; ‘या’ केंद्रीय मंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 12:26 IST

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. राहुल गांधी हे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याची शिवसेना नेते संजय राऊत यांची मागणी योग्य नाही. या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष उध्दव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढू शकतो. राऊत यांच्या मागणीने सरकारमध्ये मतभेद होतील. यातून सरकार कोसळेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

अहमदनगर : सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. राहुल गांधी हे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याची शिवसेना नेते संजय राऊत यांची मागणी योग्य नाही. या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष उध्दव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढू शकतो. राऊत यांच्या मागणीने सरकारमध्ये मतभेद होतील. यातून सरकार कोसळेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

रामदास आठवले हे सोमवारी रात्री काही काळ नगरच्या सरकारी विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘जेंव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उध्दव ठाकरेंचे सरकार पडेल थंड... लवकरच होणार आहे, या सरकारमध्ये बिघाडी.. जाणार आहे  महाविकास आघाडी..’ अशी चारोळी करुन रामदास आठवले म्हणाले, हे सरकार लवकरच जाणार आहे. काँग्रेसचा वेळोवेळी अपमान होत असेल तर त्यांनी देखील शिवसेना व राष्ट्रवादी सोबत न राहता सरकारचा पाठिंबा काढावा, असे आवाहन केेले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. ते सक्षम असे नेते आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष व्हावेत, असे शिवसेनेचे मत असले तरी काँग्रेस पक्ष ते अजिबात मान्य करणार नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRamdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना