शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

घोडेगाव येथे जबरी चोरी

By admin | Updated: October 10, 2016 01:03 IST

श्रीगोंदा : घोडेगाव (ता. श्रीगोंदा) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून महादेव दादाराम डेबरे यांच्या घरातून सोन्या, चांदीचे दागिने असा सुमारे चाळीस हजारांचा ऐवज चोरून नेला.

श्रीगोंदा : घोडेगाव (ता. श्रीगोंदा) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून महादेव दादाराम डेबरे यांच्या घरातून सोन्या, चांदीचे दागिने असा सुमारे चाळीस हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत डेबरे जखमी झाले आहेत. चोरट्यांची संख्या सात ते आठ होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली.श्रीगोंदा- घोडेगाव मार्गावर घोडेगाव शिवारात रस्त्याच्या बाजूला डेबरे यांची वस्ती आहे. नेहमीप्रमाणे डेबरे कुटुंबीय जेवण करून झोपले असता, पहाटे दोनच्या सुमारास घरासमोरील कुत्रे मोठ्याने भुंकू लागल्याने डेबरे दाम्पत्य जागे झाले. बाहेर कोण आहे, याचा अंदाज घेत असतानाच चोरट्यांनी दरवाजावर मोठा दगड टाकून दरवाजा तोडला व घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी महादेव डेबरे यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.चोरट्यांनी या वेळी डेबरे यांच्या पत्नीच्या गळ्यातील, कानातील सोन्याचे दागिने काढून घेत घरातील सामानाची उचकापाचक केली. चोरट्यांचे घरात तासभर वास्तव्य होते. घरात विशेष वस्तू नसल्याने चोरट्यांनी घरातील सर्व वस्तू एकत्र केल्या व घरातून बाहेर जाताना डेबरे यांचा मोबाईल दगडाने फोडला. चोरट्यांनी जाताना आरडाओरडा करू नका, आम्ही बाहेरच थांबणार आहोत, असे डेबरे यांना सांगून घराचा दरवाजा बाहेरून लावून घेत पोबारा केला.चोरट्यांनी घरात प्रवेश करण्यापूर्वी बाहेरील सर्व बल्ब फोडून टाकले. त्यामुळे घराबाहेर अंधार होता. चोरटे गेल्यानंतर डेबरे दाम्पत्यांनी मदतीसाठी ओरडा केला. मात्र त्यांच्या मदतीला कोणी आले नाही. मात्र पहाटे साडेपाचच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या एकाने डेबरे यांचा आवाज ऐकला. त्यानंतर जखमी डेबरे यांना रुग्णालयात हलविले. श्रीगोंदा पोलिसांनी निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली पेडगाव, टाकळी, आढळगाव परिसरातील काही वस्त्यांवर छापे टाकले. (तालुका प्रतिनिधी)