शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावातून चोरलेल्या दुचाकी धुळे जिल्ह्यात विकायचे; चोरट्यांसह विकत घेणाऱ्या सहा जणांना अटक 

By सचिन धर्मापुरीकर | Updated: August 2, 2023 15:47 IST

पाच दुचाकी जप्त

कोपरगाव (जि. अहमदनगर) : शहर व परिसरातून दुचाकी चोरून त्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे विक्री करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील दुचाकी विकत घेणारे तीन जणही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दि. २४ मे रोजी सागर धनिशराम पंडोरे (रा. ब्राम्हणगाव ता. कोपरगाव) यांनी त्यांची मोटार सायकल चोरी गेल्याची तक्रार दिली होती. सदर गुन्हयाचा तपास सुरु असताना पोलीस उप निरीक्षक रोहीदास ठोंबरे यांना गुप्त बातमीदाराकडून  माहीती मिळाली की, कोपरगाव येथून चोरीस गेलेले वाहने ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागात विकलेली आहे. या माहीतीच्या आधारे कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पथक हे सिन्नर येथे गेले. तेथे संशयीत गणेश जेजुरकर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथीदार दिनेश राजेंद्र आहेर (वय ३०, रा. ब्राम्हणगाव ता. कोपरगाव) व अजित कैलास जेजुरकर (वय २४, रा. ब्राम्हणगाव ता. कोपरगाव) यांच्या मदतीने मोटारसायकल चोरल्याचे सांगीतले.  दोन्ही संशयितांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींकडे मोटार सायकल चोरीबाबत चौकशी केली असता, त्यांनी पाच मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली. 

वरील आरोपी यांनी चोरलेल्या दुचाकी शिरपुर (जि. धुळे) येथे विकल्याचे समोर आले. त्यानंतर दुचाकी विकत घेणाऱ्या प्रविण सुका कोळी (वय ३२) , प्रमोद झुंबरलाल कोळी (वय २३) व हर्षल राजेंद्र राजपुत (वय २३, तिनही  रा. उपरपिंड ता. शिवपुर जि. धुळे) यांना ताब्यात घेवुन त्यांनी विकत घेतलेल्या मोटार सायकल जप्त केल्या. या गुन्ह्यात एकुण सहा आरोपी अटक केली आहे. त्यांचेकडुन चोरलेल्या पाच मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.  आरोपींकडुन मोटारसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.ही कारवाई  पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पो. स. ई. रोहीदास ठोंबरे, पो.स.ई भरत दाते, पोहेकॉ डी. आर. तिकोने, ए.एम. दारकुंडे, महेश गोडसे, जालिंदर तमनर, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर भांगरे, विलास मासाळ, एम.आर. फड, बाळु धोंगडे, राम खारतोडे, जि.व्ही. काकडे यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRobberyचोरी