शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरातील म्हाळुंगी नदीवरील पूल खचला; पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद! 

By शेखर पानसरे | Updated: October 13, 2022 18:56 IST

संगमनेरातील म्हाळुंगी नदीवरील पूल खचला असून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. 

संगमनेर : शहराच्या जवळून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून ते संतोषी माता मंदिरापर्यंत असलेला पूल गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास खचला. पूल धोकादायक झाल्याने लगेचच पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शहरातील रंगार गल्लीपासून पुढे गेल्यानंतर म्हाळुंगी नदीचा पूल ओलांडला असता, साईनगर, संतोषी माता मंदिर, पंपिंग स्टेशन, घोडेकर आणि म्हाळस मळा परिसर आहे. तसेच साई मंदिराशेजारी देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय आहे. या सर्व परिसरांना जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल खचला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून पुलाच्या पलीकडे राहणाऱ्या नागरिकांना अकोले नाक्याकडून जावे लागणार असल्याने मोठे अंतर वाढले आहे.

ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात शहर, उपनगरे तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. त्यामुळे त्यांनाही महाविद्यालयात जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. म्हाळुंगी नदीला पाणी नसताना साईनगर, घोडेकर आणि म्हाळस मळा परिसरात राहणारे रहिवासी म्हाळुंगी नदीपात्रातून जातात. मात्र, नदीला पाणी असल्याने नदीपात्रातून जाता येणे शक्य नाही. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून संगमनेर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी थांबून आहेत.                          पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यताशहराच्या काही भागांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन म्हाळुंगी नदीच्या पुलावरून नेण्यात आली आहे. पूल खचल्याने पाईपलाईनचे देखील नुकसान झाले असून शहराच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम संगमनेर नगर परिषदेकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम तात्काळ सुरू केल्याचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर