शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काका-पुतण्याने केला तृप्तीचा खून

By admin | Updated: August 27, 2014 23:08 IST

पारनेर : संतोष लोणकर व मंगेश लोणकर या काका-पुतण्यांनी दत्ता शिंदे या कामगाराला सोबत घेऊन तृप्ती तुपे या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़

पारनेर : संतोष लोणकर व मंगेश लोणकर या काका-पुतण्यांनी दत्ता शिंदे या कामगाराला सोबत घेऊन तृप्ती तुपे या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अळकुटी येथील साईनाथ विद्यालयात दहावीत शिक्षण घेणारी लोणी मावळा येथील तृप्ती पोपट तुपे ही विद्यार्थिनी २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान लोणी मावळा येथील तिच्या राहत्या घरी जात असताना संतोष विष्णू लोणकर (वय ३४), मंगेश लोणकर व विहीर खोदाईचे काम करणारा दत्ता शिंदे (रा़अंबड, जि़जालना, सध्या रहिवाशी लोणीमावळा) यांनी तिला पाटचारीच्या पुलाखाली खेचून अत्याचार केला़ त्यानंतर या गोष्टीचा बोलबाला होऊ नये म्हणून तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे़ मंगेश व दत्ता यांना पारनेर न्यायालयाने दोन सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.संतोष लोणकर हा तीन मुलींचा बाप आहे. तो तृप्तीला नेहमी छेडछाड करायचा. कधी तिच्या रस्त्यावर तर कधी बसस्थानकाजवळ थांबून तो तृप्तीवर नजर ठेवायचा. २२ आॅगस्टला पाच वाजता तृप्ती लोणी मावळा बसस्थानकावर उतरली असता पाऊस सुरु होता. त्यावेळी ती घराकडे निघाल्याचे पाहून संतोषने तिचा पाठलाग केला. त्याने मदतीला त्याचा पुतण्या मंगेश लोणकरला घेतले. मग विहिरीच्या कामावर असलेला दत्ता शिंदे यालाही बोलावले. लोणकर आपला पाठलाग करीत असल्याचे तृप्तीच्या लक्षात आले़ मात्र, जोराचा पाऊस झाल्याने तिने एका झाडाचा आधार घेतला़ ते पाहून दत्ता शिंदे याने तिला उचलून जवळच असलेल्या कालव्याच्या पुलाखाली नेले. त्यानंतर नराधम संतोष, मंगेश व दत्ता या तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. आणि नंतर दगड व तीक्ष्ण हत्याराने खूनही केल्याचा पोलिसांसमोर उलगडा झाला. (तालुका प्रतिनिधी)