अहमदनगर : जानेवारी महिन्यांत पेपर फुटीमुळे रद्द झालेली टीईटीची परीक्षा १८ मार्चला होणार होती. मात्र, त्या दिवशी तांत्रिक अडचण आल्याने आता ही परीक्षा आता ७ जूनला होणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्यावतीने देण्यात आली आहे.जिल्ह्यातून टीईटीच्या पहिल्या पेपरसाठी १० हजार ८६७ परीक्षार्थी असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. जानेवारी महिन्यांत झालेल्या टीईटीच्या दुसऱ्या परीक्षेला ९४९ परीक्षार्थींनी दांडी मारली होती. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दिलेल्या आदेशात ज्या जिल्ह्यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यांना परीक्षेचे कामकाज संपल्याशिवाय कार्यमुक्त करण्यात येऊ नयेत, अशी विनंती शिक्षण निरीक्षक यांच्याकडे केलेली आहे. परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती कडूस यांनी दिली. (प्रतिनिधी)
७ जूनला टीईटीची परीक्षा
By admin | Updated: May 24, 2016 23:42 IST