शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तेरे जैसा यार कहा... पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे गाणे सोशल मीडियावर सुपरहीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 16:01 IST

सध्याच्या ताण-तणावातून मनाला शांती विरंगुळा मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून हिंदी, मराठी गाणे गाण्याचा आनंद लुटत आहेत. जाधव यांचे ‘तेरे जैसा यार कहा’ हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

श्रीगोंदा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात संचारबंदी आदेशाचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व त्यांच्या टीमने जबरदस्त कामगिरी चालविली आहे. सध्याच्या ताण-तणावातून मनाला शांती विरंगुळा मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून हिंदी, मराठी गाणे गाण्याचा आनंद लुटत आहेत. जाधव यांचे ‘तेरे जैसा यार कहा’ हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचे २९ रुग्ण सापडले. मात्र श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, अरविंद माने, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या टीमने डोळ्यात तेल घालून कोरानाचा श्रीगोंद्यात शिरकाव होऊ दिला नाही.संचारबंदी काळात राजकिय नेत्यांनी घरात राहून आपले छंद जोपासण्याचे काम चालविले आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ते त्यांच्या कामाच्या व्यस्ततेतून वेळ मिळाल्यानंतर हाती माईक घेत अधून-मधून गाण्यांची मैफल रंगवत आहेत. श्रीगोंद्याचे सुनील तुकाराम दरेकर, अनिल ननवरे, चिंभळे येथील डॉ. सुनील जाधव हे गाण्याचा छंद जोपासत आहेत. श्रीगोंद्याचे हमीद सय्यद, काष्टीचे गुलाब तांबोळी हे अंभगाच्या मैफलीत दंग झालेले आहेत.संचारबंदीच्या काळात कामाचा ताण वाढला आहे. पण नैतिक जबाबदारी आणि जाणिवेतून कोरोनापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी काम करत आहे. त्यातून थोडासा विरंगुळा व्हावा म्हणून संगीताशी नाते जोडले आहे, अशी भावना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा