शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, रुग्णालयाच्या चर्चेवरून तणाव : संगमनेर पंचायत समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:05 IST

पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत दुष्काळात पिण्याच्या पाण्यावर प्रभावी उपाययोजनाबाबत चर्चा सुरू होती.

संगमनेर : पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत दुष्काळात पिण्याच्या पाण्यावर प्रभावी उपाययोजनाबाबत चर्चा सुरू होती. यावेळी सदस्य अशोक सातपुते यांनी वस्तुस्थितीची माहिती न घेता अडथळा आणल्याचा आरोप उपसभापती नवनाथ अरगडे यांनी केला आहे. मात्र, साकूर येथील ग्रामीण रूग्णालयाचा विषय सुरू असताना मला अरगडे यांनी बोलू न दिल्याचा खुलासा सातपुते यांनी केला आहे.विकासकामात अडथळे नको. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करु, असे आवाहन सभापती निशा कोकणे यांनी केल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होऊन बैठक शांततेत पार पडली. गुरूवारी पंचायत समिती सभागृहात सभापती निशा कोकणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसभापती नवनाथ अरगडे, सदस्य अशोक सातपुते, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे व इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीत साकूर गणाच्या सदस्या संगीता कुदनर या पठार भागातील पाण्याच्या परिस्थितीबाबत बोलत होत्या. यावेळी सदस्य सातपुते यांनी वस्तुस्थितीची पूर्ण माहिती न घेता महिला सदस्याच्या मांडणीत मध्येच अडथळा आणला, अशी माहिती अरगडे यांनी दिली.याबाबत खुलासा करताना सातपुते म्हणाले, पंचायत समितीच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर साकूर येथील ग्रामीण रूग्णालयाचा विषय सुरू असताना बैठकीस तेथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसून केवळ कर्मचारी हजर होते. त्यांच्याकडून माहिती घेत असताना मला अरगडे यांनी बोलू न दिल्याचे सातपुते म्हणाले. यावरून अरगडे व सातपुते यांच्यातील वादग्रस्त चर्चेमुळे सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर या दोघांमध्ये सभापती कोकणे व इतरांनी मध्यस्थी केली. विकासकामात अडथळे नको. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करु, असे आवाहन कोकणे यांनी केल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होऊन बैठक शांततेत पार पडली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर