शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा फाटा येथे दुचाकीला कट मारल्यामुळे तणाव; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिटल वाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:47 IST

येथे दुचाकीवरुन जात आसलेल्या युवकाला कट मारुन त्या युवकालाच एका गटाने दमबाजी केल्याने वाद झाला. यामुळे दोन गट आमने-सामने आले़ त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. याची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे घटनास्थळी पोहोचले.

नेवासा फाटा : येथे दुचाकीवरुन जात आसलेल्या युवकाला कट मारुन त्या युवकालाच एका गटाने दमबाजी केल्याने वाद झाला. यामुळे दोन गट आमने-सामने आले़ त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. याची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करीत जमावाला पांगविले व वादावर पडदा टाकला़ ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली.नेवासा फाटा रोडवरुन नेवाशाकडे दुचाकीवरुन चाललेल्या एका युवकाला पाठीमागून येणा-या युवकाने शिवाजीनगर परिसरात कट मारला. याचा जाब विचारण्यास गेलेल्या या युवकाला वायररोप काढून मारहाण करण्याचा प्रयत्न कट मारणा-या युवकाने केला. त्यामुळे दोघांचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे वाहतू कोंडी झाली. याची माहिती मिळताच अवघ्या पाच मिनिटात नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवून दोन गटातील वाद मिटविला.दोन्ही गटातील वाद मिटल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. नेवासा फाटा व परिसरात दोन गटातील किरकोळ वादातून मोठ्या घटना घडल्याची अनेक उदाहरणे ताजे असतानाच सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, अशी चर्चा बघ्यांमध्ये यावेळी रंगली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा