शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

मायंबा गडावर लाखो भाविकांनी घेतले मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:06 IST

श्री क्षेत्र मायंबा येथील यात्रेनिमित्त शुक्रवारी लाखो भाविकांनी मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मच्छिंद्रनाथांच्या जयजयकाराने मंदिर परिसर दुमदुमला होता.

मढी : श्री क्षेत्र मायंबा येथील यात्रेनिमित्त शुक्रवारी लाखो भाविकांनी मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मच्छिंद्रनाथांच्या जयजयकाराने मंदिर परिसर दुमदुमला होता.पौष अमावस्या हा मच्छिंद्रनाथ यात्रेचा मुख्य दिवस असतो. वर्षभरात पौष अमावस्या, गुढीपाडवा समाधी उत्सव, मच्छिंद्रनाथ जन्म उत्सव या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नाशिक, गंगापूर, ठाणे या भागातील भाविक गुरुवारी रात्रीच येथे मुक्कामी आले होते. शुक्रवारी पहाटे देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के यांच्या हस्ते पहाटे नाथांचे संजीवन समाधीची महापूजा, महाभिषेक करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या भाविकांनी गुरूवारी रात्रीच गर्दी केली  होती. नगर, आष्टी, धामणगाव, पाथर्डी व परिसरातील वाड्या, वस्ती, तांडे येथील पायी येणा-या भाविकांचीही संख्या लक्षणीय होती. दुपारी माध्यान्हीचे महाआरतीला प्रचंड गर्दी झाली होती. राज्य परिवहन मंडळाच्या विविध जिल्ह्यांमधून येणा-या भाविकांना बसेसची संख्या कमी पडल्याने काहींना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. दुपारी आरतीनंतर सावरगाव ते मच्छिंद्रनाथ गड दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. गो शाळेच्या आवारात वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.  दुपारी देवतलाव येथून कोठी मिरवणूक वाजत गाजत निघाली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक ग्रामस्थ उपस्थित होते. तुपात तयार केलेल्या रोटांचे भाविकांना वाटप करण्यात आले.  देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, सावरगावचे सरपंच राजेंद्र म्हस्के, विश्वस्त अनिल म्हस्के, उपाध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, साहेबराव म्हस्के, चंद्रकांत लोखंडे, प्रल्हाद म्हस्के यांनी येणा-या भाविकांचे स्वागत केले. सर्व विश्वस्त मंडळ, सावरगाव ग्रामस्थ व कर्मचारी यांनी यात्रा नियोजनासाठी परिश्रम घेतले. शनिवारी धर्मनाथ बीज व कुस्त्यांचा हंगामा होऊन यात्रेची सांगता होईल.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर