शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा परिषदेत टेंडर घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 17:31 IST

पाचेगाव पाणी योजनेतील टेंडर घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम (दक्षिण व उत्तर) विभागातील सर्वच टेंडरच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी दिले़

अहमदनगर : पाचेगाव पाणी योजनेतील टेंडर घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम (दक्षिण व उत्तर) विभागातील सर्वच टेंडरच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी दिले़ मात्र, चौकशी समितीपासून टेंडरबाबतची माहिती लपविण्याचा खटाटोप विभागप्रमुखांकडून सुरु आहे़ त्यामुळे चौकशी रखडल्याचे सांगण्यात येते़नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील पाणी योजनेचा टेंडर घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेने काढलेल्या मागील १ वर्षातील सर्वच टेंडरची चौकशी हाती घेण्यात आली़ त्यामुळे एप्रिल २०१८ पासून ते आत्तापर्यंत काढलेल्या सुमारे १ हजार ८०० टेंडरची चौकशी सुरु करण्यात येणार होती़२० मार्चपर्यंत हा चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना द्विसदस्यीय समितीला दिल्या होत्या़ मात्र, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम (दक्षिण व उत्तर) विभागाकडून टेंडरबाबतची माहितीच चौकशी समितीला उपलब्ध करुन दिली जात नाही़ त्यामुळे चौकशी समितीने दोन वेळा विभागप्रमुखांशी पत्रव्यवहार करुन माहिती देण्याची विनंती केली़ मात्र, समितीच्या पत्रांना विभागप्रमुखांनी केराची टोपली दाखवल्याचे सांगितले जात आहे़ तथापि, सोमवारी झालेल्या बैठकीत विभाग प्रमुख माहिती लपवत असल्यावरुन चांगलीच खडाजंगी झाल्याचे समजते़विभाग प्रमुखांना माहिती द्यायची नसेल तर सर्वच विभागांमध्ये टेंडर घोटाळा असू शकतो, असा निष्कर्ष का काढू नये, अशी विचारणाही चौकशी समितीकडून या बैठकीत करण्यात आल्याचे समजते़विविध कामांचे यापूर्वी आॅनलाईन काढलेल्या टेंडरची कमीत कमी रक्कम किती होती, कोणत्या ठेकेदाराने किती रकमेचे टेंडर भरले होते, प्रत्यक्ष वर्कआॅर्डर कोणाला मिळाली आणि त्या-त्या कामांचा आयडी अशा माहितीची मागणी चौकशी समितीकडून विभागप्रमुखांकडे करण्यात आली आहे़ मात्र, ही माहिती अद्याप चौकशी समितीला न मिळाल्यामुळे चौकशी रखडली आहे़काय आहे टेंडर घोटाळापाचेगाव (ता़ नेवासा) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाचेगाव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती़ १ कोटी ४५ लाख रुपयांच्या या कामासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून आॅनलाईन पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली़ यात सर्वात कमी म्हणजे १ कोटी २० लाख रुपये (उणे तीन टक्के) रकमेचे टेंडर आॅनलाईनमध्ये मंजूर करण्यात आले़ मात्र, प्रत्यक्षात सहा टक्के जास्त रकमेची निविदा भरलेल्या ठेकेदाराच्या नावाने कार्यारंभ आदेश काढण्यात आला होता़ त्यामुळे ठेकेदाराला निविदा रकमेपेक्षा सुमारे ९ लाख रुपये जास्तीचे मिळणार होते़ याबाबत तक्रार आल्यानंतर या टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्यात आली़ त्यात हा टेंडर घोटाळा उघडकीस आला़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर