शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात दीडशे टँकर जिल्ह्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 11:25 IST

स्वाभिामानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशी मंगळवारी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात ३ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, पोलीस बंदोबस्तात १५० टँकर जिल्ह्याबाहेर पाठविले आहेत.

अहमदनगर : स्वाभिामानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशी मंगळवारी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात ३ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, पोलीस बंदोबस्तात १५० टँकर जिल्ह्याबाहेर पाठविले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून दूध बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात प्रभात, राजहंस, गोदावरी, अकोले, कोपरगाव आदी प्रमुख दूध संघ आहेत. या दूध संघांनी सोमवारी दूध संकलन बंद ठेवले होते. त्यामुळे २४ लाख लिटर दूध जागेवरच राहिले. दुस-या दिवशी मंगळवारी मात्र संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, पाथर्डी तालुक्यांतील दूध संघांनी दुधाचे संकलन केले. नगर जिल्ह्यातून पुणे, नाशिकमार्गे मुंबईला, तर श्रीरामपूरमागे मराठवाड्यात दूध पुरवठा होतो. पोलीस बंदोबस्तात १५० टँकर जिल्ह्याबाहेर पाठविले असून, मराठवाड्यातून आलेले शासकीय दूध योजनेचे दोन टँकर पुणेमार्गे पोलीस बंदोबस्तात मुंबईला रवाना करण्यात आले. कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यांतील दूध संकलन दुस-या दिवशी मंगळवारी बंद होते. संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा तालुक्यांतील दूध संघांनी दुधाचे संकलन केले.५० जणांवर कारवाईदूध संकलनात अडथळा येत असल्याने जिल्ह्यातील ५० दूधउत्पादक शेतकºयांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच सात जणांना अटक करण्यात आली आहे.जिल्ह्यात सकाळच्या सत्रात तीन लाख लिटर दुधाचे संकलन झाले आहे. दूध संघांना पोलीस संरक्षण दिले असून, पोलीस बंदोबस्तात टँकर पाठविले आहेत. -व्ही.एन. नारखेडे,जिल्हा दुग्ध विकास अधिकारी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMilk Supplyदूध पुरवठा