शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दहा तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 25, 2016 00:09 IST

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे़ परंतु पावसाला हवा तसा जोर नाही़ जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पावसाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली आहे़

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे़ परंतु पावसाला हवा तसा जोर नाही़ जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पावसाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली आहे़ मात्र दहा तालुक्यांत जेमतेमच ४५ टक्केपेक्षा कमी पाऊस पडला़ त्यामुळे खरिपाची चिंता दूर झाली खरी, पण पुढे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे़ धरण पाणलोट क्षेत्रात मध्यंतरी पावसाचा जोर वाढला़ त्यामुळे भंडारदरा व मुळा धरणातील पाण्याच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली़ धरण निम्मे भरल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली़ पुढील आॅगस्टच्या १५ तारखेपर्यंत मुळा धरण १०० टक्के भरते, असा अनुभव आहे़ जुलैचा शेवटचा आठवडा सुरू झाला़ पण धरणे निम्मेच आहे़ त्यामुळे धरणांतून शेतीसाठी पाणी देता येईल, अशी स्थिती सध्या तरी नाही़ जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे़ तुलनेने पाऊस कमी आहे़ जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार अकोले, श्रीरामपूर, शेवगाव आणि कर्जत तालुक्यांत ५० टक्केहून अधिक पाऊस पडला़ पण, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नेवासा, राहाता, राहुरी, नगर, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यांत जेमतेम ४५ टक्के पाऊस पडला़ निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यांची संख्या अधिक आहे़ढगाळ वातावरण आहे़ पावसाच्या सरींवर सरी सुरू आहेत़ त्यामुळे खरिपाची पिके तग धरून आहेत़ त्यात पावसाच्या हलक्या सरींमुळे पिकांवर दुष्परिणाम झाला आहे़ तण कमालीचे वाढले आहे़ खुरपणीसाठी माणसे मिळत नाहीत़ सततच्या पावसाने खुरपणीच्या कामात अडथळा येत असल्याने बळीराजाही हैराण आहे़ कमी पाऊस त्यात वाढलेले तण, यामुळे पिकेही धोक्यात आहेत़ मागील वर्षी दक्षिण नगर जिल्ह्यातील जुलैअखेर निम्म्याहून अधिक पाऊस पडला होता़ तुलनेत यंदा दक्षिणेतील जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, पारनेर, नगर तालुक्यांत कमी पाऊस पडला़याउलट स्थिती उत्तर नगर जिल्ह्यात आहे़ मागील वर्षी उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले वगळता संगमनेर, कोपरगाव, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्यांत कमी पाऊस पडला होता़ यंदा जुलैअखेर उत्तर नगर जिल्ह्यात ३० टक्केहून अधिक पाऊस पडला़ त्यामुळे खरिपाची चिंता दूर झाली खरी, पण त्यानंतरच्या पिकांचे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे़ पोषक वातावरण असूनही पावसाची टक्केवारी वाढत नसल्याने मोठ्या पावसाठी परतीच्या मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार काय, अशी भिती व्यक्त होत आहे़