शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वती नदीत कोसळला टेम्पो; दहा प्रवाशी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 15:40 IST

श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव-पेडगाव रस्त्यावर असणा-या सरस्वती नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने धाडस करुन टेम्पो पाण्यात घातला़ ...

श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव-पेडगाव रस्त्यावर असणा-या सरस्वती नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने धाडस करुन टेम्पो पाण्यात घातला़ मात्र, पुराच्या वेगामुळे हा टेम्पो नदीत कोसळला़ दरम्यान टेम्पोतील दहाही प्रवाशांनी प्रसंगावधान राखीत बाजूला उड्या घेत जीव वाचवले़ ही घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.तालुक्यात सर्वत्र धो धो पाऊस पडत आहे. नदी- नाल्याना पूर आला आहे. पेडगाव परिसरात असणा-या सरस्वती पुलावरून शुक्रवार सकाळपासून पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. दरम्यान शनिवारी सकाळी काष्टीचा बाजार असल्याने राशीन, भिगवण परिसरातून येणा-या बाजारकरुची मोठी गैरसोय झाली़ राशीन परिसरातील एक पिकअप टेम्पो काष्टी येथे दहा प्रवाशाना घेऊन निघाला होता़ या पिक अपमध्ये काही दुचाकीही होत्या. पिकअप सरस्वती नदीवरील पुलावरून जात असताना चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा वेग जास्त असल्याने टेम्पो प्रवाहासोबत नदीत कोसळला. दरम्यान चालकाने पुरात टेम्पो घालताच प्रवाशांनी धोका ओळखून बाजूला उड्या मारल्या़ त्यामुळे सर्व प्रवाशी बचावले़ परिसरातील नागरिकांनी मदतकार्य करीत हा पिकअप टेम्पो पाण्याबाहेर काढला.