शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

 'अहो सोडा मला.. इंग्लिश शिकवून सोडा.....'

By नवनाथ कराडे | Updated: September 20, 2017 20:47 IST

शिक्षणावर भाष्य करणा-या चित्रपटाचे लेखन - दिग्दर्शन पंचवीशीतील महेश रावसाहेब काळे याने केले आहे. चित्रपटातून जिल्हा परिषदेच्या शाळा आणि 'इंग्रजी मिडियमच्या स्कूल'धील फरकाचे वास्तव महेशने मांडले आहे. सद्यस्थितीत या चित्रपटातील 'मला इंग्लिश शिकवून सोडा' या लावणीचा आॅडीओ सध्या सर्वांचे लक्ष्य वेधून घेत असून पसंतीस उतरत आहे

ठळक मुद्देत्रिवेणी संगम लाभलेली लावणीगुरु ठाकूर यांची रचनाफुलवा खामकरची कोरिओग्राफी वैशाली जाधवची अदाकारी  

नवनाथ खराडे,

लोकमत न्यूज नेटवर्क 

अहमदनगर : लावणी हा महाराष्ट्राच्या मातीमधील कलाप्रकार. शृंगाराची खाण असणारी लावणी महाराष्ट्राची शान. लास्य रसाचे दर्शन घडविणारा लोकप्रिय लोककलेचा प्रकार. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा रस. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. हाच त्रिवेणी संगम 'घुमा' चित्रपटातील 'मला इंग्लिश शिकवून सोडा' या लावणीतून लवकरच अनुभवायला मिळणार आहे. 

लवकरच 'घुमा' चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. शिक्षणावर भाष्य करणा-या चित्रपटाचे लेखन - दिग्दर्शन पंचवीशीतील महेश रावसाहेब काळे याने केले आहे. चित्रपटातून जिल्हा परिषदेच्या शाळा आणि 'इंग्रजी मिडियमच्या स्कूल'धील फरकाचे वास्तव महेशने मांडले आहे. सद्यस्थितीत या चित्रपटातील 'मला इंग्लिश शिकवून सोडा' या लावणीचा आॅडीओ सध्या सर्वांचे लक्ष्य वेधून घेत असून पसंतीस उतरत आहे. लावणीच्या आॅडिओने प्रेमात पडलेले रसिकांना व्हिडीओची उत्सुकता आहे. व्हिडीओ आल्यानंतर रसिकांना त्रिवेणी संगमाचा अविष्कार लुटता येणार आहे. गीत, नृत्य आणि अदाकारी या तीनही बाजू लावणीत सक्षमपणे साकारल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द गीतकार गुरू ठाकूर यांनी लावणी शब्दबध्द केली आहे. ऋषिकेश, सौरभ अन जसराज जोशी यांनी संगीत दिले असून प्रिया बर्वे यांच्या आवाजाने रंगत आली आहे.  फुलवा खामकरच्या कोरिओग्राफीवर वैशाली जाधवने नृत्याविष्कार साकारला आहे. वैशाली जाधव ढोलकीची तालावरची विजेती असल्याने लावणीत अदाकारीची चांगलीच इंग्लिश शिकली आहे. त्यामुळे ही लावणी एकदा पाहून हौस भागणार नसून परत परत पाहावी लागणार हे मात्र नक्की. हीच लावणी चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  

लावणीचे बोलकधी एल यू एल यू म्हणतयंकधी नुसतचं मिस यू धाडतयंरोज मेसेजमंदी राया, काय कळना इंग्लिश धाडतयं...कसं जाणावं त्याच्या मनातलं..या भाषेनं केलाय राडा अहो सोडा मला.. इंग्लिश शिकवून सोडा.....