शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकान हटविण्यासाठी अकोलेत शिक्षकांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 20:28 IST

येथील मॉडर्न हायस्कूलजवळ असलेले देशी दारू दुकान हटवावे, या मागणीसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील महात्मा फुले चौकालगत अकोले-देवठाण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

अकोले : येथील मॉडर्न हायस्कूलजवळ असलेले देशी दारू दुकान हटवावे, या मागणीसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील महात्मा फुले चौकालगत अकोले-देवठाण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.शाळेच्या भिंतीजवळ असलेले हे दारुचे दुकान हटवावे म्हणून अनेक दिवस प्रयत्न करूनही प्रशासन दाद देत नसल्याने शेवटी शिक्षकांनी रास्ता रोको आंदोलन केले. डॉ. कुलकर्णी हॉस्पिटलसमोर देवठाण रस्त्यावर ठिय्या देत मॉडर्न हायस्कूल, भास्करराव कदम ज्युनियर कॉलेज व ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांनी देखील या आंदोलनात उपस्थिती दर्शविली. हायस्कूलपासून घोषणा देत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महात्मा फुले चौकात आले. त्यांनी रस्ता अडवून आंदोलनामागील भूमिका भाषणांमधून विषद केली. या देशी दारूच्या दुकानाजवळ अनेकदा भांडणे होतात. दारू प्यालेले पुरुष व महिला रस्त्यावर दारू पिऊन पडतात. महिलांनाही दारू दिली जाते. याचा विपरीत परिणाम मुलांच्या मनावर होतो. या दुकानामुळे शाळचे पवित्र वातावरण गढूळ होऊ लागले आहे. त्यामुळे हे दुकान तेथून स्थलांतरित करावे, अशी शाळेची मागणी आहे. तसा स्कूल कमिटीने ठराव करून दिला आहे. पण तांत्रिक कारण सांगून प्रशासनाकडून दुकानास अभय दिला जात आहे. माजी प्राचार्य शांताराम गजे, स्कूल कमिटी अध्यक्ष सतीश बूब, ज्युनियर कॉलेज अध्यक्ष दिलीप शहा, प्राचार्य संतोष कचरे, शिक्षक दीपक जोंधळे, हेरंब कुलकर्णी यांची भाषणे झाली. १५ दिवसात कारवाई न केल्यास विद्यार्थी व पालक रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तहसीलदार मुकेश कांबळे, उत्पादन शुल्क अधिकारी परदेशी व पोलीस निरीक्षक शिळीमकर यांनी निवेदन स्वीकारले. प्रा. डी.के.वैद्य, ज्ञानवर्धिनीचे मुख्याध्यापक रावसाहेब नवले, उपमुख्याध्यापक विनीत भालेराव, दिलशाद सय्यद, प्रा.चंद्रकांत नवले आदिंसह तालुका दारूबंदी आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते निलेश तळेकर, संदीप दराडे, सुनील उगले, जालिंदर बोडखे आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले